भांडवस्ती ते दगडी पूल रस्ता दुरुस्त न झाल्यास निवडणुकीवर सामुहिक बहिष्कार

Cityline Media
0
आश्वी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दाढ खुर्द येथे दाढ खुर्द व खळी गावाला जोडणारा मुख्य रस्ता भांडवस्ती ते दगडी पूल तसेच दाढ फाटा ते चनेगाव हा रस्ता गेली अनेक महिन्यापासून मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याची संख्या मोठी असल्याने व चार चाकी व सहा चाकी आठ चाकी व दहा चाकी आधी अवजड वाहनाचे प्रमाण जास्त असल्याने रस्त्याच्या कडेला धुळीने येथील नागरिक त्रस्त झाले असून येथील नागरिकांनी हा रस्ता डांबरीकरण 

करण्यासाठी अनेक वेळा लोकप्रतिनिधी व संबंधित सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडे वेळोवेळी निवेदन देऊन देखील हा रस्ता होत नसल्याने दाढ खुर्द गावातील व खळी गावातील नागरिकांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त करत येत्या पंधरा दिवसांमध्ये या रस्त्यावरील खड्डे प्रशासनाने न बोलल्यास व पुढे दोन महिन्यांमध्ये डांबरीकरण करण्याचा लेखी आश्वासन दिल्यास येथील नागरिक येथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांवर मतदानावर बहिष्कार टाकणार आहे.

यापुढील काळामध्ये लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यांनी मतदान मागू नये मतदान मागण्यास आले तर आपण केला जाईल असा इशारा येथील नागरिक देत असून या रस्त्याने अनेक छोटी मोठी अपघाते झाले असून येथे शाळकरी लहान लहान मुले मुली या रस्त्याने जाळे करत असतात.

अनेक वेळा शाळकरी मुली मुलांचे मोटरसायकल व सायकलवर अपघात झाले असून येथील दोन्ही गावातील नागरिकांनी ग्रामसभा व ग्रामपंचायतला वेळोवेळी मागणी करूनही हा रस्ता होत नसल्याने येथील नागरिकांनी भविष्यात आंदोलनाचा इशारा दिला असून हा रस्ता नागरिकांच्या अडीअडचणीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असल्याने या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी वैयक्तिक लक्ष घालून येत्या एक महिन्यांमध्ये डांबरीकरण सुरू करावे असे आवाहन रस्त्या लगत राहणाऱ्या नागरिकांसह शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींनी व नागरिकांनी केला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!