भारतीय राज्यघटना जगातील सर्वश्रेष्ठ-ॲड प्रकाश संसारे

Cityline Media
0
श्रीरामपूर प्नतिनिधी भारतीय राज्य घटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना असून जगातील इतर देशांनीही त्यांची राज्य घटना बनविणेसाठी भारतीय राज्य घटनेचा आधार घेतला,असे प्रतिपादन जेष्ठ विधिज्ञ व नोटरी पब्लिक ॲड.प्रकाश संसारे यांनी केले.
श्रीरामपूर येथील सेंटलुक कॉलेज ऑफ नर्सिंग व बॉस्को ग्रामीण विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरुषाचे प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमात श्रीरामपुर येथील सेंट लुक कॉलेज ऑफ नर्सिंग येथे आयोजित भारतीय राज्य घटना या विषयावर बोलतांना ॲड प्रकाश संसारे यांनी प्रतिपादन केले.

पुढे बोलताना,भारतीय राज्य घटनेमध्ये नागरिकांचे हक्क हे अतिशय महत्वपूर्ण असून समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार,शोषणा विरुध्दचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार व संविधानिक उपाय योजना अधिकार हे अधिकार असून हे सर्व अधिकार मानवी स्वातंत्र्याचे रंक्षण करतात.

त्याशिवाय भारतीय राज्य घटनेमध्ये राज्य धोरण निर्देशक मार्गदर्शक तत्वे असून त्यामध्ये स्त्री पुरुषांना उदरनिर्वाहाचे समान साधन व अधिकार मिळणेसाठी, सर्वांना समान न्याय,कामगार व शेतकरी वर्गासाठी तरतुद, बालकांच्या मोफत शिक्षणासाठी तरतुद अशा प्रकारे मार्गदर्शक तत्वे असून शिवाय घटनेमध्ये नागरिकांचे मुलभूल कर्तव्यही समाविष्ट केलेले आहेत.

भारतीय राज्य घटनेमध्ये सर्वांना समान न्याय हे तत्व अवलंबविलेले आहे.त्यामुळे समाजातील उच्च, निचता, भेद-भाव, व देशाप्रती जाणीवा निर्माण झालेल्या आहेत. भारतीय राज्य घटना निर्माण करणेमागे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अतिशय अमूल्य आहे. त्यामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोशल वर्क डिपार्टमेंटचे सिस्टर रिटा, सिस्टर जॅकलीन,तेरेजा तेलोरे व सविता धाहिजे यांनी परिश्रम घेतले.या शिबिरामध्ये मच्छिंद्र गंगाधर गोलवड, प्रदिप भाऊसाहेब भालेराव, सुनिल आप्पासाहेब पंडीत,यशवंत चंद्रकांत लोखंडे, रोहन दिपक चव्हाण,

प्रदिप विलास ठुबे,इब्राहिम मुसा शेख,संतोष माणिक अमोलिक,अरुण माणिक अमोलिक,भागवत भिमराज काळे,अरुण नाना लोखंडे, खंडू आप्पा झुर्टीग, अशोक रावसाहेब थोरे, विजय फ्रान्सीस ब्राम्हणे, भगवान गुलाब भालेराव,विलास बी. बनसोडे, पंढरनाथ चांगदेव बोर्डे,संजय रावसाहेब भालेराव,भाऊसाहेब संतोष आढाव,संजय कारभारी साबळे,पुजा पाटीलबा गाडे, राज कांबळे,मयुर शेलार, भाऊसाहेब तेलोरे,रितेश साळवे, एकनाथ खरात,मिलींद खरात,सुरेश कांदळकर, सुशिल पटारे सह नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!