नाशिक दिनकर गायकवाड शासनाच्या माहिती (जिमाका व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.विविध श्रेणींतील पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र व्यक्तींनी दि.१५ मार्चपर्यंत आपल्या प्रवेशिका सादर कराव्यात,असे आवाहन संचालक (माहिती) गोविंद अहंकारी यांनी केले असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली.
यावर्षी देखील विविध क्षेत्रांतील योगदानासाठी खालीलप्रमाणे पुरस्कार दिले जाणार आहेत, त्यामध्ये उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, उत्कृष्ट लेखन पुरस्कार, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार,उत्कृष्ट छायाचित्रकार
पुरस्कार, सोशल मीडिया (समाज माध्यम) पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार यांचा समावेश आहे. स्पर्धकांचे लिखाण किंवा कार्य हे पुरस्कार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेले असावेत.
प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२६ आहे. माहिती व अर्ज नमुने शासनाच्या खालील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेतः www.maharashtra.gov.in, www.dgipr.maharashtra.gov.in,
पत्रकारांनी आपल्या संबंधित विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, https://mahasamvad.in या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुक असे आवाहन संचालक अहंकारी यांनी केले आहे.
