जिजाऊ सावित्रीचा आदर्श त्याग आचरणात आणला तर आजची महिला आदर्श घडेल

Cityline Media
0
जागतिक महिला दिनीं सौ.ज्योती पगारे यांचे प्रतिपादन

येवला महेंद्र पगारे तालुक्यातील ममदापुर येथील डोंगर दऱ्यात जागतिक महिला दिन सामाजिक कार्यकर्त्या सौ.ज्योती महेंद्र पगारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच उत्साहात पार पडला.
प्रसंगी विचार मंच्यावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे, स्वाभिमानी रिपब्लिकन रिपब्लिकन नेत्या सौ.नयना सोनवणे,अनीता मोरे,मा. सरपंच पोपट ठाकरे हे उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब,सावित्रीबाई फुले,त्यागमूर्ती माता रमाई,अहिल्यादेवी होळकर, फातिमा शेख या थोर मतांच्या जयघोष करून सौ अनिता मोरे यांच्या प्रास्ताविकेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात झाली‌.

अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना सौ.ज्योती पगारे म्हणाल्या की आज एकीकडे महीलांचा सन्मान करणाऱ्या मोठ मोठ्या जाहिराती केल्या जातात परंतु प्रत्यक्षात महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार सुरूच आहे आजही महिलांचे शोषण,बलात्कार करून मारले जाते.मुलींचा जन्म नाकारून स्त्रीभ्रूण हत्या केल्या जातात.

शासकीय योजना गरजू महीलांपर्यंत पोहचत नाही म्हणून आपण राजमाता जिजाऊंचा आदर्श सावित्रीबाई फुलेचे शिक्षण व माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांचा त्याग डोळ्यासमोर ठेवून आपल्या जिवनाची वाटचाल करा मुलांना चांगले शिक्षण द्या तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही व जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही.

देशातील सर्व महिलांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदु कोड बिल व संविधानाच्या माध्यमातून हक्क अधिकार मिळवून देत मानाचे स्थान मिळवून दिले म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार महिलांनी विसरता कामा नये असे प्रतिपादन सौ.ज्योती पगारे यांनी आपल्या भाषणातून व्यक्‍त केले.यावेळी  स्वारीपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे स्वारीपच्या महीला नेत्या सौ.नयना बाळासाहेब सोनवणे यांनी ही मनोगत व्यक्त केले.

आजचा जागतिक महिला दिन सुसज्ज हॉल,शहरात ठिकठिकाणी उत्सहात साजरे जातील पण खेड्या पाड्यातील मजुरी करण्याऱ्या माय भगिणी पर्यंत कोणी लवकर पोहचत नाही म्हणुन समाजातील शेवटच्या महिलांना शुभेच्छा दिल्या जाव्या हा प्रामाणिक उद्देश मनात घेऊन येवला शहारापासून काही अंतरावर डोंगर भागातील वाड्या वस्तीवर राहणाऱ्या शेतमजूर महिलांना व शाळेतील मुलींना एकत्र करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सौ.ज्योती पगारे यांच्या हस्ते शेतमजूरी करणाऱ्या गोरगरीब महिलांना मिठाई भरवत साड्यांचे वाटप केले व शाळेतील मुलींना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांना जागतिक महीला दिनांच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमास स्वारीपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे, स्वारीपच्या महीला आघाडीच्या नेत्या सौ.नयना सोनवणे,सौ.अनिता मोरे ,मा. सरपंच पोपट ठाकरे,बालाबाई ठाकरे, कमाबाई सोनवणे,ताराबाई मोरे, हिराबाई मोरे,मंगलाबाई ठाकरे,सुनीता पवार, छाया पवार,लंकाबाई पवार, राधाबाई मोरे,अशोक पवार,सागर मोरे,परशुराम मोरे,भाऊलाल पवार, भाऊसाहेब मोरे,संजय मोरे यांच्यासह अनेक महीला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!