नाशिक दिनकर गायकवाड थोर साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी लोककवी वामनदादा कर्डक यांची सिन्नर तालुक्यातील जन्मभूमी देशवंडी येथे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला.
याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वामनदादांच्या स्मृतींना आणि कार्याला वंदन केले.
प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले , शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सामाजिक न्याय मंत्री.संजय शिरसाट खासदार-आमदारांसह, समाज कल्याण आयुक्त दिव्याली बुधोल-मुंडे ,
नाशिक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, बाटणेचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सहाय्यक आयुक्त देविदास नांगगावकर, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, रविंद्र वामनराव कर्डक, विद्रोही कवी संदेश कर्डक, बोरस्ते, विजय करंजकर,भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, दिलीप खैरे, प्रशांत दिवे, बाळासाहेब कर्डक, संजय, प्रवीण कर्डक सानप ,गावातील ग्रामस्थ समस्त कर्डक परिवार जिल्ह्य़ातील आंबेडकरी समुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
