वरवंडी येथे बिरोबा महाराज यात्रा उत्साहात

Cityline Media
0
वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथे नुकतीच बिरोबा महाराज वरवंडी यात्रा पार पडली त्यात्रेत भाविकांनी आत्मियतेने सहभाग दर्शविला.
यात्रेचे सालाबाद प्रमाणे गागरे परिवार यात्रेचे चोख नियोजन करून यात्रेत कुठलाही गोंधळ गडबड किंवा यात्रा व्यवस्थित पार पडेल याची काळजी घेते.यात्रेची सुरुवात सकाळच्या आरतीने होते सायंकाळी आठ वाजता गावातील महिला गव्हाच्या पिठाच्या कणकेचे दिवे म्हणून अर्थ त्याच्या आरत्या तयार करतात या आरत्यांची व मानाच्या काठीची मिरवणूक काढली जाते.

संपूर्ण गावातून मिरवणूक झाल्यानंतर बिरोबा महाराज मंदिर या ठिकाणी येऊन बिरोबा महाराजांचे दर्शन घेऊन भक्तांच्या अंगामध्ये बिरोबांचा संचार होतो त्यांची भागीते झाल्यानंतर भाविक जेवणासाठी बसतात यावर्षीची पंगत  अशोक बाबासाहेब गागरे व शंकर मच्छिंद्र गागरे यांनी संयुक्तपणे अन्नदान केले अन्नदान झाल्यानंतर भाविकांना सुश्राव्य अशा भक्तिमय वातावरणामध्ये देवांच्या गीतांचा कार्यक्रम पार पडला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!