तारण मिळकत परस्पर विकल्याने तिघांसह महिला वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड खासगी सावकाराकडून
व्याजाने घेतलेल्या ३६ लाखांच्या तारणासाठी दिलेली मालमत्ता व्याजासह संपूर्ण रक्कम अदा केलेली असतानाही मिळकतीची परस्पर खरेदी देऊन फसवणूक केल्याप्रकरणी तिघांसह महिला वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी हर्षल सुकदेव उशीर (रा.अस्पंद बंगला, सप्तशृंगी चौक, गंगापूर रोड) हे वास्तुविशारद आहेत. दि. ८ जानेवारी २०२० ते दि. २९ जुलै २०२५ या कालावधीत आरोपी खासगी सावकार अमित बाळासाहेब जाधव, योगेश गंगाधर बोडके, प्रल्हाद पुंडलिकराव कदम यांनी संगनमत करून फिर्यादी उशीर यांचा विश्वास संपादन केला.

उशीर यांनी खासगी सावकाराकडून ३५ लाख ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. या रकमेकरिता तारण म्हणून दिलेली व व्याजासह संपूर्ण रक्कम अदा करूनही आरोपींनी सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवून फिर्यादीच्या मालकीची मखमलाबाद शिवारात तिघांसह वकिलाविरुद्ध गुन्हा

असलेली सव्र्व्हे नंबर ३१५/१/अ/२/क या मिळकतीचे आरोपींनी व्याजाने दिलेल्या रकमेच्या सिक्युरिटीपोटी दि. ८ जानेवारी २०२० रोजीचे नोटरी, साठेखत, करारनामा व दुय्यम निबंधक वर्ग-५ नाशिक यांच्याकडे नोंदविलेले विशेष मुखत्यारपत्र व दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी फिर्यादी उपस्थित नसताना ॲड. नोटरी संजीवनी कमाले यांनी आरोपी अमित बाळासाहेब जाधव व योगेश गंगाधर बोडके यांच्या लाभात नोटरी कायम खरेदी खत तयार करून दिले.

फिर्यादीकडून व्यवहारापोटी घेतलेल्या कोऱ्या पेपरवर केलेली फिर्यादीची सही व अंगठ्याच्या ठशाचा वापर करून फिर्यादीच्या मालकीच्या मखमलाबाद शिवारातील मिळकत परस्पर संगनमताने प्रल्हाद कदम यांनी त्याला दिलेल्या विशेष अधिकाराचा गैरवापर करून अमित जाधव व योगेश बोडके यांच्या नावे खरेदी करून देऊन फसवणूक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चार जणांसह एका वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.सपकाळे हे करित आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!