राहुरी प्रतिनिधी समाजातील शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटकातील शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नियमित प्रयत्नशील असणाऱ्या आणि पक्षाची विचारधारा जनसामान्यापर्यंत पोचवण्यासाठी एक कार्यकर्ता जे समाजकार्य केले ते वाखण्याजोगे आहे.
त्याची पावती म्हणून राहुरी येथील सौ. सारिका संदीप गांगुर्डे यांची नुकतीच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.अलका बोर्ड यांच्या सहीने सौ.सारिका गांगुर्डे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट महिला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम यांच्या हस्ते राहुरी येथे सन्मानपूर्वक देण्यात आले. सौ. गांगुर्डे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
