कोल्हार भगवतीपुरात इफ्तार पार्टीतून भाईचारा संदेश

Cityline Media
0
मंत्री विखे पाटील आणि युवानेते 
डॉ.सुजय विखे पाटील यांचा पुढाकार

कोल्हार अरुण बोरूडे पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपुर येथील लोणी रस्त्यावरील मशिदीत पालकमंत्री मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व युवानेते डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील व डॉ.सुजय विखे पाटील यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमातून सर्वधर्म समभाव, बंधुभाव आणि सामाजिक एकोप्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

रमजान महिना इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र मानला जातो.या महिन्यात मुस्लिम बांधव पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत रोजा ठेवून संयम, त्याग आणि प्रार्थनेच्या माध्यमातून आत्मशुद्धी साधतात.दिवसभराचा उपवास संपवून सायंकाळी इफ्तार करून रोजा सोडण्याची परंपरा आहे.या निमित्ताने आयोजित इफ्तार पार्टीत विविध धर्मीय नागरिक एकत्र येत सामाजिक सलोखा आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला जातो.

या कार्यक्रमात साहेबराव धडे, ज्ञानेश्वर खर्डे,श्रीकांत बेंद्रे तसेच सुनील बोरुडे यांनी मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जपलेल्या सर्वधर्म समभावाच्या विचारातून शिर्डी मतदारसंघात सामाजिक ऐक्य आणि सलोखा जपण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे सांगण्यात आले. भाईचारा टिकवणारा मतदारसंघ म्हणून शिर्डी मतदारसंघाची ओळख निर्माण झाली असून विखे पाटलांचे पालकत्व हीच कार्यकर्त्यांची भावना असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

इफ्तार पार्टीच्या माध्यमातून गावातील विविध धर्मीय नागरिक एकत्र येऊन सामाजिक एकोपा, परस्पर स्नेह आणि भाईचाऱ्याचा संदेश दिला गेला. अशा उपक्रमांमुळे गावातील एकतेची परंपरा अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव दळे,ज्ञानेश्वर खर्डे,भरत खर्डे, स्वप्निल निबे, श्रीकांत खर्डे, पंढरीनाथ खर्डे,विजय निबे, गोरक्षनाथ खर्डे, राजेंद्र राऊत,प्रकाश खर्डे,श्रीकांत बेंद्रे,सुनील बोरुडे, तबाजी लोखंडे, संतोष लोखंडे,अरुण बोरुडे,इलियास शेख, सिकंदर शेख,राजू शेख, असिफ शेख, युनुस शेख, वसिम पिंजारी,नजीर सय्यद,आदिल शेख,मौलाना मुस्ताजा आलम,शब्बीर,अन्वर कलंदर, समीर शेख,जाकिर शेख,दिलावर शेख, राजमहम्मद, अल्लाबक्ष शेख यांच्यासह गावातील युवक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!