कानिफनाथ मढी यात्रेनिमित्त चंद्रपुरात हरीनाम किर्तन आणि महाप्रसाद सोहळा उत्साहात

Cityline Media
0
लोणी ज्ञानेश्वर साबळे राहता तालुक्यातील लोणी लगत असलेल्या चंद्रपूर येथील ह.भ.प. मायराज महाराज अनर्थे यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री क्षेत्र कानिफनाथ (कान्होबाची) मढी येथील वार्षिक यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मुळा-प्रवरा परिसर, लोणी आणि कानिफनाथ भक्त मंडळाच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे यंदा २३ वे वर्ष होते. यात्रेनिमित्त आयोजित भव्य हरीकीर्तन आणि महाप्रसाद सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.हा मुख्य सोहळा रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता करण्यात आली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. गुरुवर्य मायराज महाराज अनर्थे यांच्या सुश्राव्य वाणीतून झालेले हरीकीर्तन. यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले की, हरीकीर्तन श्रवण केल्याने मनुष्य जीवन सुधारित आणि सुसंस्कृत होते, तसेच हरीकीर्तनाच्या निमित्ताने घेतलेल्या महाप्रसादाने जीवन शुद्ध होते.

कीर्तनानंतर दुपारी १२ वाजेपासून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, जो सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होता. हा संपूर्ण कार्यक्रम मढी येथील निवडुंगे रोडवर, पार्किंगच्या पश्चिम बाजूला असलेल्या मैदानात पार पडला. कानिफनाथ भक्त मंडळ मुळा-प्रवरा व गोदावरी परिसर, तसेच हरिभाऊ हिरामण साळुंखे आणि सर्व भाविकांनी मिळून या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. यात्रेच्या निमित्ताने परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!