नाशिक दिनकर गायकवाड सिन्नर तालुक्यातील खंबाळे जिल्हा परिषद शाळेत शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विज्ञान शिक्षक श्री.खाडे यांनी.सी.व्ही.रमण यांचे विज्ञान क्षेत्रातील कार्य व मानवी जीवनातील विज्ञानाचे महत्व यावर मनोगत व्यक्त केले.इयत्ता ५वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी निवडक प्रयोग सादर केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.अत्रे व इतर सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते.