महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २ मध्ये स्वच्छता मोहिम

Cityline Media
0
स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे विशाल सावंत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली सर्वंकष स्वच्छता मोहिम ही अविरतपणे सुरू असून नुकतेच महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र.२ मध्ये डीप क्लीन ड्राईव्ह घेण्यात आला.माझे शहर स्वच्छ राखण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याची स्वच्छतेची शपथ घेवून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
या मोहिमेस ठाणे महापालिका प्रभाग क्र.२ मधील स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे,अर्चना मणेरा,कमल चौधरी, विकास पाटील यांच्यासह परिमंडळ उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त मधुकर बोडके आदी उपस्थित होते.

महापौरपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी कोपरी प्रभागातून स्वच्छता मोहिम हाती घेतली. महापालिका हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आज प्रभाग क्र. २ मधील रुतू इस्टेट ते काबरा सर्कल, काबरा सर्कल ते महाराणा प्रताप चौक, काबरा सर्कल ते आझादनगर सर्कल, श्री मॉ शाळा ते रोडाझ सोसायटी, पातलीपाडा ब्रिज ते कै. चिमा बाबु दळवी चौक ते श्री माँ शाळा व देव भक्ती सोसायटी परिसर, महाराणा प्रताप चौक ते रिजेन्सी टॉवर मार्गे शिवनेरी सोसयटी तुर्फा पाडा,श्री दुर्गा माता मंदिर रोड आझादनगर सर्कल ते ब्रह्मांड सर्कल मुख्य रस्ता आदी परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेस परिसरातील नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता मोहिम नियमित सुरू असून स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेवून त्यांच्याकडून येणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना महापौर शर्मिला प‍िंपळोलकर यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सर्व रस्ते साफ करुन त्यानंतर पाण्याच्या सहाय्याने रस्ते स्वच्छ करण्यात आले. याकामी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला. आर्यन जेटींग गाडी, रस्ते स्वीपींग मशीन, २ लहान घंटागाड्या, धूर व औषध फवारणी सहाय्याने ही मोहिम राबविण्यात आली.यावेळी मुख्य स्वच्छता निरीक्षक शयूराज कांबळे,उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी यांच्यासह सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!