नाशिक दिनकर गायकवाड फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून एका कंपनीच्या संचालकांनी नाशिकच्या इसमास साडेचीदा लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी बोट ब्रो या कंपनीचे संचालक लवीश चौधरी उर्फ नवाब अली याने फिर्यादीबरोबर यूट्यूब व झूम मिटिंगद्वारे संपर्क साधला. तसेच फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक
केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष फिर्यादीला दाखवण्यात आले.आरोपीने वारंवार फिर्यादी यांना संपर्क साधून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. ह्या आमिषाने
आरोपीने फिर्यादी यांची १४ लाख ५८ हजार ३४० रुपयांची फसवणूक करून ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर जमा करण्यास प्रवृत केले. हा प्रकार सन २०२३ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत घडला.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात बोर्ट-ब्रो कंपनीच्या संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहे.
