एकलव्य बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी कैलास पवार

Cityline Media
0
सचिव पदी रवी अहिरे यांची निवड

लोणी प्रतिनिधी राज्यस्तरावर शोषित वंचित दुर्लक्षित घटकासाठी कार्यरत असणारी आणि विस्थापित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणाऱ्या एकलव्य बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील आंबेडकर चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्व कैलास बाबुराव पवार यांची अध्यक्षपदी निवड केली असल्याची घोषणा एकलव्य बहुजन समाज पार्टीच्या लोणी येथील संपर्क कार्यालय मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष रेवननाथ जाधव यांनी केले.
यावेळी पक्षाच्या महत्त्वाच्या पदावर काही पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या महत्त्वाच्या पदावर निवड केली असून पुढील प्रमाणे राष्ट्रीय महासचिव पदी डॉ.राहुल अहिरे महाराष्ट्राचे सचिव पदी तुषार अहिरे महाराष्ट्र राज्य प्रभारी गौरव  माळी माधव भांगरे यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष 

रामेश्वर जाधव यांची अहिल्यानगर जिल्हा प्रमुख पदी तर राहुरी तालुका अध्यक्षपदी दौलत मार्तंड पवार तर सिन्नर कार्याध्यक्षपदी रोशन अभंग आधी प्रमुख मान्यवरांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रेवणनाथ जाधव यांनी निवडी घोषित करून या पुढील काळामध्ये पक्षाच्या यावरील पदाधिकाऱ्यांनी 

पक्ष वाढीसाठी गावोगावी शाखा उघडून पक्षाच्या माध्यमातून गरीब जनतेची सेवा करावी तसेच विविध शासनाच्या योजना कॅम्प घेऊन पक्षाच्या माध्यमातून गरीब जनतेचे प्रश्न सोडवावेत लवकरच एकलव्य बहुजन समाज पार्टीच्या पक्षाचा मेळावा राहुरी येथे सर्व 

पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेणार असून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत एकलव्य बहुजन समाज पार्टी ताकतीनिशी उतरणार असून विधानसभेची जागा मित्रपक्षाने दिली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष रेवणनाथ जाधव यांनी केली असून जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ताकतीनशी लढणार असून अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा आदिवासी समाजाचा होणारा असून पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकद लावून कामाला लागावे असे आव्हान यावेळी रेवांना जाधव यांनी केले आहे सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याच्या अनेक जिल्ह्यातून पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!