डॉ.विखे पाटील कृषि महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबीर नांदगावात उत्साहात

Cityline Media
0
आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक घडविण्यासाठी श्रमसंस्कार शिबिर उपयुक्त- सरपंच श्री.सरक

अहिल्यानगर प्रतिनिधी जिल्ह्यातील विळदघाट येथे असलेल्या डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालय  आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर २२ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील नांदगाव येथे नुकतेच उत्साहात पार पडले.
प्रसंगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण दांगडे यांनी प्रास्ताविकात सात दिवस राबवलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

या शिबिरात शाश्वत विकासासाठी युवक- जलसंधारण,पडीक जमीन व्यवस्थापनावर विविध उपक्रम राबवण्यात आले,त्यामध्ये जलसंधारण अभियान,वृक्ष संवर्धन, ग्रामस्वच्छता,डिजिटल साक्षरता अभियान,शेती विषयक मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास,बालविवाह प्रतिबंधात्मक जनजागृती, रस्ते दुरुस्ती, नव मतदार जनजागृती इत्यादी उपक्रम राबवण्यात आले. 

अध्यक्षीय भाषणात यावेळी सरपंच सखाराम सरक यांनी स्वयंशिस्त,कष्टाची तयारी व परिस्थिती जाणीव हे त्रिसूत्री तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी श्रमसंस्कार शिबिर उपयुक्त असल्याचे सांगण स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक यावेळी नांदगावचे लोकनियुक्त सरपंच यांनी केले.

 शिबिराच्या समारोप प्रसंगी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. दौलतराव नलावडे, प्रा.डॉ. विवेक निकम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.जयश्री राऊत,डॉ. दीपिका मावळे, नांदगाव सोसायटीचे मा. अध्यक्ष तथा विद्यमान संचालक राजाराम पुंड, ग्रामपंचायत सदस्य नाथाभाऊ सरक,.बाळू वर्पे, सौ.स्वाती वैभव आघाव, उद्योजक दत्तात्रय पुंड, विलास सोनवणे, डॉ. सतिश सोनवणे, ह.भ.प. संकपाळ महाराज.आबा पुंड आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना विलास सोनवणे उद्योजक तथा प्रगतशील शेतकरी यांनी पाणलोट क्षेत्र विकास व पडीक जमीन व्यवस्थापन या विषयाचे महत्त्व अधोरेखीत केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य बाळू वर्पे यांनी यावेळी सांगितले की स्वयंसेवकांनी आपल्या उज्वल भविष्याच्या वाटचालीत समाज व राष्ट्राचे देणे लागते ही जाणीव कायम ठेवावी,फुल ना फुलाची पाकळी या भावनेतून जरी सेवा केली तरी समाजासाठी अत्यंत मोलाची ठरते.ग्रामीण भागातील जीवनशैली आदर्शवत आहे याचा जवळून अनुभव घेण्याची सुवर्णसंधी स्वयंसेविकांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून मिळाली कृषीचे विद्यार्थी विविध क्षेत्रात वर्चस्व गाजवतात कारण त्यांची जडणघडणच अशा शिबिरातून झालेली असे मत प्रा.जयश्री राऊत यांनी व्यक्त केले. तर प्रा.डॉ. दीपिका मावळे यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 मा.सरपंच राजाराम पुंड यावेळी बोलताना म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना केवळ एक सामाजिक उपक्रम नसून विद्यार्थ्यांना जीवन मूल्याची जाणीव करून देणारे प्रभावी व्यासपीठ आहे या शिबिरामुळे सामाजिक बांधिलकी दुढ होते. 

 शिबिरासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे संचालक (तंत्र) सुनील कल्हापुरे तसेच कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.सोमेश्वर राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमांमध्ये स्वयंसेविका नम्रता पोपळघाट व तृप्ती भापकर यांनी आपले सात दिवसातील आलेल्या अनुभव कवितेतून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका अनुष्का तुपे तर आभार श्रावणी ताडे यांनी केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!