हिवरगाव पावसा येथे देवगड चषक क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

Cityline Media
0
ग्रामीण खेळाडूंना क्षमता, कौशल्य सिद्ध करण्याची संधी 

संगमनेर नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे भाजपा महायुती यांच्या वतीने आयोजित देवगड चषक टेनिज बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे.
ग्रामीण भागात योग्य क्षमता असलेले अनेक खेळाडू आहेत.त्यांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून नावलौकिक वाढवावे,अशी अपेक्षा असते. मात्र,या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता म्हणाव्या तशा स्पर्धा होत नाहीत.हीच बाब हेरून महायुती भाजपाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

देवगड देवस्थानच्या मैदानावर शनिवार दि.०६ पर्यंत या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडणार आहे.या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील तरुणांना आपली जिद्द दाखवण्याची संधी मिळत आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून ग्रामीण भागात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास एकवीस हजार रुपयांचे पारितोषिक,तर व्दितीय पारितोषिक अकरा हजाराचे, तृतीय पारितोषिक सात हजाराचे तर या सह इतर अनेक पारितोषिक दिले जाणार आहे.स्पर्धेच्या आयोजनासाठी
देवगड देवस्थान ट्रस्ट,सरपंच सेवा संघाचे बाबासाहेब पावसे,

समर्थ एन्टरप्रायजेस जे.सी.पी स्पेअर,ओम साई हायड्रॉलिक,श्री गणेश अर्थमुव्हर्स,नितीन बन्सी पावसे,
गणेश सातपुते,जय मल्हार कांती संघटना,ओम साई तरुण मित्र मंडळ,उमाजी नाईक मित्र मंडळ,शिवछत्रपती मित्र मंडळ,जय मल्हार क्रिकेट टिम,उंबरवाडी मित्र मंडळ,

मुळगंगा मित्र मंडळ,म्हसोबा नगर मित्र मंडळ,
कला सम्राज्ञी पवळा कला मंच, श्री.गणेश मित्र मंडळ,जय भिम मित्र मंडळ,महायुती-भारतीय जनता पार्टी हिवरगाव पावसा यांचे विशेष सहकार्य मिळत आहे.सदर स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील अनेक संघानी सहभाग घेतल्याची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ पावसे,भाजपा तालुका सरचिटणीस गणेश दवंगे,भाजपा तालुका उपाध्यक्ष केशव दवंगे यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!