गुंजाळवाडी येथील राहणे मळ्यात गुरुवार पासून अखंड हरिनाम सप्ताह

Cityline Media
0


आमदार अमोल खताळ आणि पत्नी सौ.नीलम खताळ यांची प्रमुख उपस्थिती

संगमनेर प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी  (राहणे मळा) परिसरातील हनुमान मंदिरात गुरुवार दि. २६ मार्च २०२६ ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्त सात दिवस महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार यांचे कीर्तन होणार आहे. या सप्ताहला आमदार अमोल खताळ आणि  पत्नी नीलम खताळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सालाबादप्रमाणे याहीवर्षी राहणे मळा येथील अखंड हरिनाम सप्ताह साठी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तन कार व प्रवचनकार यांची कीर्तने व प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत.त्यात रामायणाचार्य निवृत्ती महाराज रायते समाजप्रबोधनकार जयश्रीताई महाराज तिकांडे, गायनाचार्य ज्योती महाराज धनाडे,  विनोदाचार्य सागर महाराज दिंडे, शिवचरित्रकार दत्तात्रय महाराज धुमाळ,  समाजप्रबोधनकार संदीप महाराज खडांगळे आणि  शिवशंभो चरित्रकार अनिल महाराज देवळेकर यांची कीर्तने होणार आहेत.

तसेच ईश्वरी जाधव, पायल चकोर, सृष्टी महाराज कासार, शोभा महाराज जगताप, एवायणी अहिरे, सुनीता भागवत व बन्सी महाराज गुंजाळ यांची प्रवचने होणार आहेत.तर या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी भागवताचार्य पोपट महाराज राक्षे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होऊन महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.

या धार्मिक सप्ताहासाठी राहणे मळा, कु-हे मळा, अरगडे मळा, लक्ष्मी नगर गुंजाळ मळा जगताप मळा,खटकाळी मळा, श्रीराम नगर, विठ्ठल नगर, पुंडमळा, गोल्डन सिटी तसेच गुंजाळवाडी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राहणे मळा अखंड हरिनाम सप्ताह समितीने केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!