गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची भर उन्हात मोठी रांग;सर्वसामान्यांचे हाल

Cityline Media
0
केंद्र व राज्य सरकार लवकरच गॅस टंचाईवर तोडगा काढेल-मंत्री विखे पाटील 

लोणी रुपाली भालेराव सध्या सुरू असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईमुळे आणि गॅस कंपन्यांनी बुकिंग रचना बदलल्यामुळे मागील आठवड्यापासून स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरसाठी नागरिक तासनतास पहाटे पासून रांगा लावत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
राहता तालुक्यातील लोणी येथे गेल्या काही दिवसांपासून परिसरात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील म्हणाले की केंद्र शासन व राज्य सरकार यावर तोडगा काढत आहे.

सकाळी सूर्योदया पासूनच नागरिक रिकामे सिलेंडर घेऊन रांगेत उभे असतात यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार मागील दोन-तीन दिवसापासून गॅस सिलेंडरची गाडी वेळेवर येत नसल्यामुळे अनेक कुटुंबामध्ये चूल पेटणे कठीण झाले आहे.

ज्यांना घरपोच गॅस सिलेंडर टाकी मिळाली नाही त्यांनी मुख्य वितरण केंद्रावर धाव घेतली रस्त्याच्या कडेला झाडांच्या सावलीत आधार घेताना दिसतात.ज्येष्ठ नागरिक देखील रांगेत उभे असल्याचे चित्र दिसत आहे रांगेत महिलांची ही संख्या लक्षणीय आहे घरातील कामे सोडून त्यांना गॅस सिलेंडरसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे.

सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे भर दुपारी रांगेत उभे राहणे हे नागरिकांना त्रासदायक ठरत आहे गॅस सिलेंडर हे जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने त्यात उन्हाचा त्रास सहन करूनही नागरिक मोठ्या संख्येने रांगेत उभे राहताना दिसतात हा गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सभोवतालच्या परिसरातून केली जात आहे.

इराण विरुद्ध इस्राइल आणि अमेरिका यांच्या सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटताना दिसत आहे.यामुळे नागरिकांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाले आहे पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये गॅस टंचाईमुळे खूप काही अडचणी येऊ शकतात या भीतीमुळे नागरिकांनी भर उन्हात देखील गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे राहून प्रतीक्षा करत असल्याचे दिसून येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!