इगतपुरीत अल्पवयीन मुलीचे अपहरण

Cityline Media
0
इगतपुरी बोधिवती देहाडे येथील १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील फांगुळगव्हाण येथील अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे नुकतेच तिला अज्ञात व्यक्तीकडून कशाचे तरी आमिष दाखवून तिला पळवून नेल्याची संतापजनक घटना घडली आहे.

 कुटुंबांनी तिचा सर्वत्र शोध घेऊनही त्यांना काहीच सुगावा लागला नाही म्हणून तिच्या पालकांनी इगतपुरी पोलीस ठाणे इथे धाव घेऊन त्या अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात केला आहे. पुढील तातडीचा तपास पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव ह्या करीत आहे.

याच महिन्यातील ही चौथी घटना असुन सर्वत्र खेद व्यक्त होत आहे.याआधी ३७ वर्षीय महिलेचा विनयभंग, प्रकरण,सहा वर्षीय बालिकेच्या गुप्त भागाला स्पर्श, आणि आता अल्पवयीन मुलींचे इगतपुरीतुन अपहरण या महिन्यात महिला सुरक्षतेचा प्रश्न जास्त जोर धरतोय असा संतप्त सूर नागरिकांकडून निघतोय
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!