२९ मार्चला चंद्रपूरात एकादशी निमित्त किर्तन सोहळ्याचे आयोजन

Cityline Media
0
लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील चंद्रपूर येथे शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर भव्य एकादशी कीर्तन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या चार वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या या उत्सवाचे चौथे वर्ष असून परिसरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली आहे. हा सोहळा रविवारी  २९ मार्च रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रसिद्ध भागवताचार्य चांदवड येथील ह.भ.प.सीमा काळे यांचे सुश्राव्यवाणीतून हरिकीर्तन होणार आहे सीमा काळे या शिव कथा पुराण कथाकार म्हणूनही ख्यातनाम असून त्यांच्या सुश्राव्यवाणीतून श्रोत्यांना अध्यात्माची शिदोरी मिळणार आहे.

चंद्रपूर पंचक्रोशीतील भजनी मंडळाच्या संकल्पनेतून या विशेष सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या हरिकीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.हा संपूर्ण उत्सव योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज, गुरुवर्य तपनिती ब्रह्मलीन संत नारायण गिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पार पडणार आहे.

तसेच ह भ प महंत दत्तागिरी महाराज आणि ह. भ.प. परमहंस स्वामी मुक्तानंद गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे या मंगलप्रसंगी किर्तन,संत पूजन आणि फराळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या महाप्रसादाचे अन्नदाते दाढ बुद्रुक येथील  अर्बन को ऑफ बँकचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग बाबुराव बनसोडे पांडुरंग अर्बन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ह. भ.प. मायराज महाराज अनर्थे आणि सर्व हरी चरणराज सेवक परिश्रम घेत आहे हा भव्य भक्ती सोहळा चंद्रपूर येथील हनुमान मंदिरात होणार आहे कीर्तनानंतर महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या किर्तन सोहळ्यात तन्मयतेने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!