चिंचोली विद्यालय पुणे विभागात प्रथम

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कै. जनार्दन काळे पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, येथील १९ वर्ष मुले (मोठा गट ) पुणे विभागात प्रथम आला.
शालेय ड्रॉप रो बॉल नुकतीच क्रीडा स्पर्धा पुणे येथील येरवडा विभागीय क्रीडा संकुलात पार पडल्या.या स्पर्धेत विद्यालयातील १७ वर्ष वयोगट मुली व १९ वर्ष वयोगट मुले यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड या संघांवर मात करत मुलांचा ट्रिपलचा संघ विजयी झाला.

या संघातील खेळाडू भूषण आरगडे,कृष्णा आरगडे,ओम शेलार,सुजल शिरसाठ,रोहन मुन्तोडे,यांची नाशिक येथे राज्यस्तर ड्रॉप रो बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सर्व खेळाडूंचे प्राचार्य श्री. चिंधे ,विद्यालयाचे क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक श्री.गिरी ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

तसेच संस्थेचे अध्यक्ष मंत्री.डॉ.नामदार राधाकृष्ण विखे  जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा   सौ.शालिनी विखे पाटील,मा.खा. डॉ. सुजयदादा विखे तसेच संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी .डॉ. सुश्मिता विखे, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे ,संस्थेचे संचालक अशोक गागरे, स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष शंकर लाटे ,चिंचोली गावचे सरपंच  बंटीशेठ लाटे मा. उपसरपंच बाळासाहेब पारखे .शरद आरगडे, स्थानिक स्कुल कमिटी उपाध्यक्ष सर्जेराव सोनावणे, वि. वि. कार्यकारी सोसायटी चिंचोली  अध्यक्ष गीताराम पठारे, . दिलीप दाढकर ,प्राध्यापक योगेश ओहोळ सर्व मान्यवर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!