स्वराज्य पोलिस मित्र,पत्रकार संरक्षण राहाता शहर महिला अध्यक्षपदी श्रीमती रुपाली भालेराव

Cityline Media
0
राहता प्नतिनिधी स्वराज्य पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण संघटनेची तालुक्यातील सामाजिक व संघटनात्मक घडामोडींना नवी दिशा देणारी एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली.संघटनेच्या या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या एकमताने महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. 
सर्वांच्या एकमताने राहता तालुका महिला अध्यक्षपदी रुपाली निलेश भालेराव यांची निवड करण्यात आली.हा ठराव पुढे वरिष्ठ पदाधिकारी चंद्रकांत वेदपाठक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. 

या बैठकीस अहिल्यानगर सरचिटणीस उमेश पन्हाळे, राहता तालुका कार्याध्यक्ष आबा (संपत निर्मळ),तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे तसेच सदस्य श्रीपाद बोकंद सदस्य राजेंद्र पिंपळे, सदस्य अक्षय संजय जोंधळे, उपस्थित होते.

सर्वांच्या एकमताने राहता तालुका महिला अध्यक्षपदी रुपाली निलेश भालेराव यांची निवड करण्यात आली. वरिष्ठांनी रुपाली भालेराव यांचे समाजकार्य,त्यांची तळमळ आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन या निवडीस तात्काळ मान्यता दिली.पत्रकारांशी बोलताना कार्याध्यक्ष आबा म्हणाले की रुपालीताईंच्या कार्याचा विशेष गौरव करत सांगितले की, “रुपालीताई नेहमीच गोरगरीब आणि वंचित घटकांसाठी झटत असतात. त्या समाजाच्या तळागाळातील लोकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.

महिला अध्यक्ष म्हणून त्या काम पाहतील तर महिलांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सुटतील.आजच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत,त्यांना योग्य संधी देणे हीच खरी प्रगती आहे.”या निवडीच्या निमित्ताने उमेश पन्हाळे, ज्ञानेश्वर साबळे आणि श्रीपाद बोकंद यांनी रुपाली ताईंचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राहता तालुक्यात रुपाली भालेराव यांच्या निवडीमुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असून, संघटनेच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!