प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे स्मृती साहित्य पुरस्काराचे वितरण
लोणी प्रतिनिधी एच.के .तथा हिराचंद ब्राह्मणे यांच्या द्वितीय स्मृति दिनानिमित्त "अग्निदिव्य कथासंग्रह प्रकाशन" गुणवंत विद्यार्थी,शिक्षक व साहित्यिक पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २९ मार्च रोजी सकाळी साडे अकरा.लोणी येथील संकल्प मंगल कार्यालय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय समोर साडे अकरा वा.मा.आमदार लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्ष सौ.शालिनी विखे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संयोजक तथा राहाता पंचायत समितीचे मा. सदस्य संतोष ब्राह्मणे यांनी दिली.
समारंभास शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, प्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर,शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी, दैनिक सार्वमत चे वृत्त संपादक अशोक गाडेकर,ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये,विस्तार अधिकारी अशोक विटनोर,शिक्षक नेते कैलास शिंदे, कोल्हार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भिमाई प्रतिष्ठान व साम्यक साधना संघ यांच्या वतीने लोणी प्रवरा परिसरातील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असून यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राहाता तालुका शाखेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक प्रा.शशिकांत शिंदे यांना एच.के.तथा प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, एच.के.ब्राह्मणे स्मृती जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ शिक्षक जी.ए.पठाण यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी तर के. डी.सातपुते स्मृती जीवनगौरव पुरस्कार भास्कर साळवे तथा कमलवीर प्रज्ञारत्न यांना त्यांच्या सामाजिक प्रबोधन कार्यासाठी देण्यात येणार आहे. अशी माहिती शब्दगंधचे राहाता तालुकाध्यक्ष साहेबराव तुपे यांनी दिली.
या कार्यक्रमास परिसरातील साहित्यिक,साहित्य रसिक तसेच हिराचंद ब्राह्मणे यांच्या सर्व विद्यार्थी वर्गाने उपस्थित रहावे,असे आवाहन संतोष ब्राह्मणे,सुमेध ब्राह्मणे,प्रा. डॉ.संदीप तपासे, पत्रकार सुयश वाघमारे ,विजय तांबे ,गिरीश सोनार, डॉ.नवनाथ शिंदे, सोपानराव विखे,भास्कर लगड,भिमाई प्रतिष्ठान व सम्यक साधना संघ यांनी केले आहे.
