हिंदुस्तान फिड्स कंपनीच्या निधीतून वाटप
आडगाव निलेश बोधक खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासाला बळ देण्यासाठी हिंदुस्थान फीड्स कंपनीने सेवाभावी वृत्तीने मदतीचा हात पुढे करून राहाता तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा व बेंद वस्ती शाळा येथे नुकतेच जेवणाचे डबे आणि बॅग १०० विद्यार्थ्यांना वाटप केली आहे.
सामाजिक जाण असलेले येथील साईकृपा पशुखाद्यचे सोमनाथ लहामगे यांच्या पाठपुराव्यामुळे हिंदुस्थान फीड्स कंपनीच्या सीआरएस निधीतून आडगाव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि बेंद वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील सुमारे १०० विद्यार्थ्यांना टिफिन आणि टिफिन बॅग मंजूर झाल्या.या वस्तूंचे वाटप नुकतेच उत्साहात पार पडले.
विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवणाचे आणि बॅग्स मिळाल्याने त्यांच्या शिक्षणातील उत्साह द्विगुणित झाला आहे. शाळेच्या प्रांगणात आयोजित या छोटेखानी समारंभात विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
याप्रसंगी आडगाव बुद्रुकच्या सरपंच सौ.पूनम सुनील बर्डे, उपसरपंच संजय शेळके,वाल्मिक लहामगे, गजानन लहामगे, सी.एम. शेळके, भिमराज शेळके, पोलीस उपनिरीक्षक सचिन लहामगे, हिंदुस्थान फीड्सचे क्षेत्र विक्री व्यवस्थापक पांडुरंग सातपुते,विक्री अधिकारी शुभम लांडगे आणि रामदास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रसंगी संभाजी शेळके,भिकाजी शेळके, शिवाजी राऊत,अर्जुन लहामगे, सोमनाथ वराडे, गणेश वराडे, कृष्णा वराडे, किरण चांगले, शंकर लहामगे, दिलीप लहामगे, निलेश बोधक, शिवाजी वराडे, नवनाथ वराडे, सुनील बर्डे, सुनील वराडे, प्रमोद लावरे आणि शिक्षक कोल्हे, श्रीमती डांगे आदी उपस्थित होते.
