वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरवंडी या गावची कु.हर्षदा गोरक्षनाथ गागरे ही नुकतीच एमबीबीएस ही पदविका उत्तीर्ण झाली असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वरवंडीत नव्हे तर संपूर्ण पठराभागासाठी ही गोष्ट मोठी अभिमानाची,विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणारी ठरत आहे.कारण हर्षदा ही पठार भागात पहिली महिला एम.बी.बी.एस. डॉक्टर आहे .म्हणून तिचे गावातूनच नव्हे तर संपूर्ण पठार भागातून कौतुक होत आहे.तिचे वडील गोरक्षनाथ गागरे हे शिक्षक असून आई सौ. सुनीता गोरक्षनाथ गागरे ह्या उत्तम गृहणी आहे .वडील शिक्षक असल्या कारणाने मुलीवर झालेले योग्य संस्कार व मार्गदर्शन तिच्या यशाचे प्रमुख कारण दिसते.
पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण इनोव्हेटर्स इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेरच्या चंदनापुरी या ठिकाणी झाले.तर अकरावी बारावी प्रवरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरवंडी या ठिकाणी पूर्ण करून तिने पुढील शिक्षणासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहिल्यानगर येथे गुणवत्तेवर प्रवेश मिळविला.
तिथे तिने अभ्यासू वृत्ती दाखवत यशाचे शिखर गाठले.संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पहिली महिला एम.बी बी.एस. डॉक्टर झाल्या वरवंडीतील नागरिकांची अभिमानाने मान उंचावत आहे.तिच्या यशाने वरवंडी गावच्या यशामध्ये अजून एक मानाचा तुरा रोवला आहे.
तिचे हे यश पठार भागातील मुलींना प्रेरणादायी ठरणार आहे वरवंडी सारख्या खेड्यातून देखील जिद्द चिकाटी व ध्येय ठेवून आपण यशस्वी होऊ शकतो हे तिने दाखवून दिले विद्यार्थी कालखंडात मुले अनेकदा आम्हाला योग्य कॉलेज नाही योग्य शाळा नाही असे जुजबी कारणे देतात परंतु डॉक्टर हर्षदा याचे एक उत्तम उदाहरण पठार भागातील मुलीं समोर आदर्थवत आहे जिद्द व चिकाटीने केलेली मेहनत ही आपल्याला यशा पर्यंत घेऊन जाते हे तिने दाखवून दिले.लवकरच तिच्या सत्कार समारंभाचे आयोजन देखील वरवंडी गावातील महिलांच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती आहे
