शेतकऱ्यांची नऊ लाखाचे नुकसान.
झरेकाठी सोमनाथ डोळे काल अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक परिसरात मोठे नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून,दुध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पाथरे बुद्रुक येथील शेतकरी सोपान लक्ष्मण घोलप व संजय भास्कर घोलप यांच्या गोठ्यावर वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटून पडली.या तुटलेल्या तारेमुळे गोठ्यातील गाईंना विजेचा धक्का बसून तब्बल ९ गाईंचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाने या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन पंचनामा करून मदत द्यावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
घटना घडल्यानंतर घटनास्थळी राहता तहसील कार्यालयातील तहसीलदार मोरे,विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी, अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे डॉ.संपत तांबे, डॉ.खपके, ग्राम महसूल सलीम इनामदार, ग्राम विकास अधिकारी तुषार भालेराव यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी पाथरे बुद्रुक गावचे सरपंच उमेश घोलप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राहाता उपसभापती अण्णासाहेब कडू, सेवा सोसायटी पाथरे अध्यक्ष अशोक कडू, भाऊसाहेब घोलप, मा. सरपंच पाथरे सोपान घोलप, सागर कडू,मंगेश घोलप, सागर, तेजस कडू, सिद्धार्थ कडू,मच्छिंद्र घोलप, निलेश तुंबारे, कामगार तलाठी सलीम इनामदार,जनसेवा कार्यालयाचे स्वयंसहाय्यक प्रदीप गाडेकर,संकेत दिघे, इत्यादी पदाधिकारी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते
