नाशिक दिनकर गायकवाड अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती प्रणित विश्वररत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३५ जयंती महोत्सव हुतात्मा स्मारक,नाशिक याठिकाणी जयंती महोत्सवची महत्त्वपूर्ण बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
ह्या बैठकीमध्ये जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते संतोष रखमे तर कार्याध्यक्षपदी गोकुळ लोखंडे आणि महासचिव पदी बाळासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली.
जयंती महोत्सव समितीच्या उपाध्यक्ष पदी राजेंद्र गवारे आणि सांस्कृतिक समिती प्रमुख पदी गायक - भारत सुर्वे तर सचिव मुलचंद मोरे,सिद्धेश बस्ते, मुख्य संघटक पदी विजय पंडित आदींची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
येत्या १४ एप्रिल २०२६ रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुतळा,नेहरू गार्डन, शालिमार, याठिकाणी महामानवांना सामुदायिक अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त १३५ किलो लाडू वाटप करण्याचा आणि भव्य बुद्ध भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आले.
