गुढीपाडव्याला होणाऱ्या सातपूर जत्रा उत्सव मार्गाची नाशिक महापौराकडून पाहणी

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सातपूर येथे मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या यात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला असून या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आडके यांनी  नुकतेच सातपूर येथील जत्रा उत्सव मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.जत्रा उत्सव निर्विघ्न व सुरळीत पार पडावा तसेच नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
सातपूर येथे गुढीपाडव्याच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने 'बारा गाड्या' ओढण्याची जुनी परंपरा असून हा यात्रोत्सव सातपूर ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा केला जातो. या यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि नागरिक सहभागी होत असल्याने प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.

महापौर हिमगौरी आडके यांनी पाहणी दरम्यान यात्रोत्सव मार्गावरील वीजपुरवठा, वाहतूक व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था यांचा आढावा घेतला. बारा गाड्या मार्गादर कुठेही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणे, वीजपुरवठा व पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या पाहणी दौऱ्यात महापौरांनी सातपूर गावातील निगळ गल्ली, मारुती मंदिर परिसर तसेच त्र्यंबक रोड या भागांची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि यात्रोत्सवाच्या नियोजनाबाबत माहिती घेतली.यावेळी नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका सोनाली भंदुरे,मानसी शेवरे, सविता काळे तसेच यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष भारत घाटोळ उपस्थित होते.

यावेळी शांताराम निगळ, प्रकाश निगळ, शिवाजी भांदुरे, सागर निगळ, गणेश निगळ, तुषार भांदुरे,मच्छिंद्र भांदुरे, रवी काळे, राजाभाऊ सिंग, रवींद्र काश्मिरे, लक्ष्मण घाटोळ तसेच महापालिकेचे विभागीय अधिकारी कैलास अहिरे, उपअभियंता हेमंत नांदुर्डीकर, विद्युत विभागाचे विलास गायकवाड, पाणीपुरवठा विभागाचे विनायक गांगुर्डे, आरोग्य विभागाचे चिंतामण पवार तसेच अतिक्रमण विभागाचे तानाजी निगळ आदीसह मनपा अधिकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!