तिच्यातली ती
श्वास तिचा असला तरी
जगणे मात्र तुमचे आहे।
आवाज तिचा असला तरी
ऐकणे मात्र तुमचे आहे।
चाल तिची असली तरी
लय मात्र तुमची आहे।
सुंदर नभांगणात
ताऱ्यांप्रमाणे चमचमणारी
चांदणी 'ती'।
काळोखात प्रकाशित होऊन
आत्मसन्मानासाठी धडपडणारी
'ती'।
स्त्री म्हणून दडपून ठेवतो
हा समाज तिला।
प्रश्न मांडावे जरी अपराधी
ठरवतो हा समाज तिला।
गर्भातच ही कळी
खुटली जात आहे।
उमलण्याआधी तिला
बाजुला फेकली जात आहे।
मुलगी म्हणून जन्मली
तीचा अपराध का असावा,
माणूस म्हणून जगण्याचा
तिला अधिकार का नसावा,
मनमोकळा श्वास घेऊ
द्या तिला।
जगण्याचा ही अधिकार
आहे तिला।
रूपाली निलेश भालेराव लोणी बुद्रुक
