झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील खळी येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले श्री.क्षेत्र उंबरेश्वर देवस्थान हे खळी गावच्या हद्दीत असलेले हे देवस्थान उंच डोंगरावर वसलेले आहे.या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्यामुळे बहुदा डोंगर दरीतून पायपीट करून देवस्थानाला जावे लागत असे तसेच वाहतुकीसाठी रस्ता नसल्याने मोठ्या अडचणीचा सामना येथील ग्रामस्थ व भाविक करत होते.
श्रीक्षेत्र उंबरेश्वर देवस्थानचे मठाधिपती गुरुवर्य,महंत दत्तगिरी महाराज व परिसरातील ग्रामस्थानी घाट रस्ता होण्यासाठी शिर्डी मतदारसंघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी केली होती.
मंत्री विखेंनी कोणताही विलंब न करता तात्काळ मंजुरी देऊन ३० लक्ष रुपये मंजुरी देऊन काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.श्री क्षेत्र उंबरेश्वर देवस्थान घाट रस्ता झाल्यामुळे घाटावरील खरशिंदे,खांबे, वरवंडी,वरशिंदे,चौधरवाडी येथील ग्रामस्थ, कामगार, विद्यार्थी यांना लोणी परिसरात जाण्यासाठी हा खूप जवळचा मार्ग झाला आहे.
झालेल्या रस्त्यामुळे नागरिकांची दळणवळणासाठी चांगली सोय झाली आहे.चैत्र महिन्यात उंबरेश्वर देवस्थान येथे सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी मंत्री विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून घाट रस्ता पूर्ण झाल्याने भाविकांची संख्येत नक्कीच वाढ होईल असे सांगितले जाते.
घाटाच्या वरच्या बाजूचा भागचे ही डांबरीकरण लवकर व्हावे अशी मागणी महंत दत्तगिरी महाराज व ग्रामस्थानी केली आहे.यावेळी घाटाची कामाची पाहणी खळी येथील सर्व कार्यकर्ते सुरेश नागरे, सरपंच विलास वाघमारे सचिन आव्हाड,अण्णा कांगणे,हौशीराम नागरे, बाळासाहेब आव्हाड,अमोल लबडे,अक्षय लबडे,जालिंदर आव्हाड,
गोरख घुगे,गोरख चकोर,ज्ञानदेव मुंढे,बाळासाहेब चौधरी,भास्कर मुंढे,भास्कर उगलमुगले,रमेश सानप, बाळासाहेब वाघमारे,शंकर नागरे,रमेश घुगे,भाऊसाहेब घुगे, शिवाजी लबडे,भानू कांगणे,बबन कांगणे,ज्ञानेश्र्वर लबडे,अशोक वाघमारे,तुकाराम घुगे, बाजीराव घुगे,कुंडलिक उगलमुगले,कारभारी नागरे,संतू सानप,सखाराम बोऱ्हाडे,नंदू खरात,नामदेव गिते,सोपान उगलमुगले,भानू उगलमुगले,बाबासाहेब वाघमारे,कारभारी वाघमारे, बबन तांबे,आदी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांची विशेष कृतज्ञता व्यक्त केली.
