विखे पाटलांसारखे घराणे प्रत्येक जिल्ह्यात जन्माला आल्यास संत सेवा अखंडित सुरू ह.भ.प.उरळकर

Cityline Media
0
-निष्काम कर्मयोगींचा सन्मान हे लोणीसाठी भूषणावह : सौ.विखे शालिनीताई विखे पाटील 
-हा असामान्य कार्य करणाऱ्यांचा सन्मान : उद्धव महाराज 

प्रवरानगर शंकर सोनवणे राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना संतसेवेची परंपरा चालवणारे विखे पाटील कुटुंब समाजापुढे आदर्श आहे.अशी घराणे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण व्हावेत अशी अपेक्षा निष्काम कर्मयोगी ह.भ.प. गोपाळ महाराज उरळकर यांनी व्यक्त केली.तर गेल्या नऊ वर्षांपासून राज्यातील अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निष्काम कर्मयोगींना सहकार भूमीत पुरस्कार देऊन सन्मानित करणे लोणी गावासाठी भूषणावह असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.दिसताना सामान्य पण असामान्य कार्य करणाऱ्या वारकरी संप्रदायातील संत सेवकांचा हा सन्मान असल्याचे उद्गार महंत उद्धव महाराज मंडलिक,नेवासेकर यांनी काढले. यंदाचा डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार देऊन गुरुवर्य गोपाळ महाराज उरळकर यांना प्रदान करताना सौ.शालिनीताई विखे पाटील,समवेत उद्धव महाराज व मान्यवर ( छाया- दिलीप धावणे)

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित संत तुकाराम बीज उत्सवात अकोला(विदर्भ) जिल्ह्यातील उरळ येथील ज्येष्ठ कीर्तनकार गुरुवर्य गोपाळ महाराज उरळकर यांना पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार २०२६ देऊन नुकतेच भव्य समारंभात सन्मानित करण्यात आले.

मानपत्र,स्मृतिचिन्ह व ५१ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.यावेळी जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,वरदविनायक सेवाधामचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी,प्रवरा बँकेचे 

संचालक किसन विखे,सरपंच श्रीमती कल्पना मैड,विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक धावणे,बाजार समितीचे संचालक राहुल धावणे,उद्योजक संजय धावणे,नामदेवराव वाबळे,माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे,भारत महाराज धावणे,ट्रस्टचे अध्यक्ष देवीदास म्हस्के,

गोपाल महाराज पाटील,रामभाऊ महाराज पाटील,आनंद महाराज पाटील,करण महाराज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना हभप उरळकर महाराज म्हणाले की,मी जे काही थोडं काम आजपर्यंत केले त्याचे हे फळ समजतो.मी गरीब कुटुंबात जन्मलो.

सामान्य असूनही पुरस्कारासाठी माझी निवड झाली.गेल्या २६ वर्षांपासून लोणीत संत तुकाराम बिजोत्सव होतो आहे.ही फार मोठी संत सेवा आहे.राज्यातील अनेक नामवंत ज्येष्ठ कीर्तनकार यांना हा पुरस्कार देऊन यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे.

ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव ऐकून होतो.आज त्यांच्या घराण्याचे कर्तृत्व डोळ्यांनी बघता आहे.सर्वांगीण विकास झालेला हा परिसर आहे.त्यांना आमच्या अकोला जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून जबाबदारी दिली तर आम्हाला विकास बघायला मिळेल.

संपत्ती सांभाळणारी मुलं खूप आहेत पण घराण्याच्या परंपरा सांभाळणारे फार थोडे असून त्यात विखे परिवार आहे.अशी घराणे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण झाली पाहिजे.महंत उद्धव महाराज यांचे काम खूप मोठे आहे पण ते नेहमी पडद्यामागे राहतात.

मला गुरुबंधू भास्करगिरी महाराज यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली.मी पुरस्काराच्या रकमेचे काय करणार? मी प्रशांत महाराज ताकोते यांच्या बाल संस्कार शिबिराला ही संपूर्ण रक्कम देते.ते चांगले काम करीत आहेत.

प्रसंगी सौ.शालिनीताई विखे म्हणाल्या की, डॉ.बाळासाहेब विखे पाटील हे वारकरी संप्रदायाशी जोडलेले होते.पद्मश्री विखे पाटील यांचा वारसा त्यांनी पुढे चालवला.त्यांनी संत सेवेत योगदान देताना आपल्याकडील पद आणि सत्तेचा वापर योग्य कामासाठी केला.

प्रवरा अभ्यास मंडळ स्थापन करून समाजाच्या प्रश्नाचा सखोल अभ्यास केला आणि शासकीय धोरणांमध्ये तसे बदल घडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.लोणी गावचा एकोपा आणि त्यातून झालेला विकास लक्षवेधून घेणारा आहे.संत तुकाराम महाराज ट्रस्टचे काम कौतुकास्पद असून लोणी गावच्या वैभवात भर पडत आहे.
  
उद्धव महाराज म्हणाले की,लोणी गावाला वारकरी सेवेची मोठी परंपरा आहे.भजन,कीर्तन,अन्नदान,वारी या गावात पद्मश्री विखे पाटील यांच्यापासून आहे.पुढच्या पिढ्यांनी या सेवेचा विस्तार केला.आरोग्य,शिक्षण क्षेत्रात मोठे काम इथे उभे राहिले आहे.

विखे परिवाराचे अध्यात्मिक क्षेत्रातील काम मी अनेक वर्षे बघतो आहे.हा परिवार आणि लोणी गाव संतसेवेत कायम अग्रस्थानी आहे.राज्यातील निष्काम योगी महात्म्यांचा सन्मान ही गावच्या वैभवात मोठी भर आहे.
   प्रारंभी अनिल विखे यांनी स्वागत केले.

दादासाहेब म्हस्के यांनी प्रास्ताविक,गेणुजी सुर्वे यांनी मानपत्र वाचन तर रामचंद्र निंबाळकर यांनी आभार मानले.सकाळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याचे कीर्तन झाले.सोपानराव विखे पाटील यांच्या वतीने महाप्रसाद देऊन उत्सवाची सांगता झाली.यावेळी मोठ्या संख्येने भाविक,ग्रामस्थ आणि संत प्रेमी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!