अकोले प्नतिनिधी राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पेक्षाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की या संपूर्ण अर्थसंकल्पात शेतकरी केंद्रस्थानी आहे. यापूर्वीच्या अर्थसंकल्पात त्याचा अभाव दिसावयाचा. थकित खातेदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी ही संपूर्ण कर्जमाफीसाठी टाकलेले भक्कम पाऊल आहे. याचे स्वागतच केले पाहिजे.असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे प्रांताध्यक्ष ॲड वसंत मानकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.
प्रसिद्धी पत्रकात ॲड मानकर पुढे म्हणाले की नमो शेतकरी महा सन्मान निधीसाठी ७००० कोटी,कृषी समृद्धी योजनेसाठी २००० कोटी, कृषी विद्यापीठांसाठी ५०० कोटी, फळपिक विमा योजनेसाठी ४०० कोटी,कृषी विद्यापीठांच्या बांधकाम निधीसाठी १६४ कोटी,फळबाग लागवड योजना १५० कोटी,शेतकरी अपघात विमा १२० कोटी,कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता योजनेसाठी १०० कोटी,शेतकरी कर्जमाफीसाठी २०००० कोटी, शेतकरी मोफत वीज योजना २०००० कोटी, जलयुक्त शिवार कृषी सबसिडी ६००० कोटी असे सर्व मिळून एका अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जवळपास ६०००० कोटींची तरतूद करणारा हा एक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक व महाराष्ट्र सरकारच्या अजिंठ्यावर शेतकरी हे प्रथम क्रमांकावर आहे हे अधोरेखित करणारा हा अर्थसंकल्प आहे.
असे मत ॲड.वसंत मनकर यांनी व्यक्त केले.
