राहुरी प्रतिनिधी राहुरी येथे गुरुवार दिनांक १२ रोजी सकाळी अकरा वाजता आत्मा मालिक हॉटेल नगर मनमाड रोड राहुरी न्यायालय जवळ येथे स्वातंत्र सैनिक गोपीनाथ वाघमारे बहुउद्देशीय संस्था खळी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर व झुंजार बहुजन पत्रकार संघाच्या वतीने राहुरी तालुक्यासह संगमनेर कोपरगाव राहता श्रीरामपूर आदी महत्त्वाच्या तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केले असल्याची माहिती झुंजार बहुजन पत्रकार संघाचे सचिव राजेश गायकवाड यांनी दिली.
यावेळी पत्रकाराचा सन्मान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी झुंजार बहुजन पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना शाल पेन दैनंदिनी प्रशस्तीपत्रक आदी देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती झुंजार बहुजन पत्रकार संघाचे व संस्थेचे अध्यक्ष किशोर वाघमारे यांनी दिली.
यावेळी आलेल्या सर्व पत्रकारांचे राहुरी तालुक्याच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार प्रहार चे राहुरी तालुका प्रमुख बाळकृष्ण भोसले हे स्वागत करणारा असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक पुण्यनगरीचे कोपरगाव झुंजार पत्रकार सिद्धार् मेहेरखांब करणारा असून यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सिटीलाईन न्यूज व दैनिक भूगोलचे संपादक महेश भोसले भुषवणार आहे या पत्रकार संघाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन झुंजार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनोद साळवे खजिनदार रावसाहेब पाटील काळे कोषाध्यक्ष श्री लोंढे सदस्य संजय पवार आदींनी केले आहे
