राहुरी पठार भागात अल्प वीज पुरवठ्यामुळे उभी पिके जळण्याच्या मार्गावर

Cityline Media
0
राहुरी कमलेश विधाटे राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील म्हैसगाव कोळेवाडी दरडगांव थडी या भाग मध्या सध्या पाण्याची उपलब्धता असतानाही अल्प वीज पुरवठ्यामुळे पिकांना मोठा फटका बसत आहे दिवसभर वीज येत असली तरी ती वारंवार खंडीत होत आहे पाणी चालू असताना पाणी शेतात जाईपर्यंत पर्यंत वीज खंडीत होत असल्यामुळे सिंचनाचे नियोजन कोलमडले गेले आहे रात्री जरी वीज असली तरी रात्री बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावय असल्यामुळे शेतात शेतकरी जाण्यास धजावत नाही त्यामुळे नियोजन कोलमडले आहे परिणामी पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्यामुळे अनेक पिके जळण्याच्या मार्गावर असल्याचे दिसुन येत आहे.
 वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांना मोटार सुरू करून पाणी देणे कठीण झाले आहे मोटार सुरू केल्यानंतर पाणी वाफ्यापर्यंत पोहोचण्याआधीच वीज जाण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने सिंचन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहे त्यामुळे ऊस,घास ,मक्का , कांदा इतर पीक व भाजीपाला नगदी पिकांना पाणी देताना शेतकऱ्याना मोठी  कसरत करावी लागत व शेतीमालाला बाजारात दर कमी होते चालले आहे.

 शेतकऱ्याना आधीच वीजचे अडचण होती त्यामध्ये आर्थिक अडचणीत पण येऊ लागल्या आहे अशा पस्थितीत तोंडाशी आलेली पिके वाचावण्यासाठी ही पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्याने मोठी नुकसान होते त्यामुळे भीती निर्माण झाली आशी भीती व्यक्त केली जात आहे.

या पाश्वभूमीवर महावितरण विभागाने शेती पंपासाठी निर्यामत व खंडीत करू नये अशी मागणी विलास गागरे , शंकर कोरडे ' अनेक शेतकरी करत आहे हे झाले नाही महाविरण  विरोधात आंदोलन करण्यात येईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विलास गागरे करत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!