भंडारदरा येथे धम्म यात्रा उत्साहात

Cityline Media
0
लेझिम नृत्य,लाठी- काठी,मर्दानी खेळ पारंपरिक वाद्यांनी मिरवणुकीत रंगत
 
संगमनेर नितीनचंद्र भालेराव अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे मा. मंत्री दादासाहेब  रूपवते यांच्या १०१ व्या जयंती निमित्त धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या सत्रामध्ये भगवान गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फूले व सर्वच महापुरुषांना अभिवादन करत दिवंगत दादासाहेब, दिवंगत प्रेमानंद व दिवंगत स्नेहजाताई रूपवते यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.

पंचशील ध्वजरोहण व बुद्ध वंदनेचा कार्यक्रम पार पडला. जपान येथून आलेले भन्ते तेरासावा गुरुजी व पुणे येथील भंते नागघोष ज्यांनी उपस्थितांना धम्म-देसना दिली. सुशिलाबाई दादासाहेब रूपवते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

दुपारी शेंडी गावातील  यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली. विविध गावांचे पारंपारिक वाद्य ताफे व महिलांच्या लेझीम पथकानी सर्वांचे लक्ष वेधले. 
लाठी काठी,मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांसोबत ढोल,हलगी, महिलांचे लेझिम अशा पारंपरिक वाद्यांनी मिरवणुकीत रंगत निर्माण केली.मिरवणुकीत जोर्वे येथील लाठी काठी पथकाच्या मर्दानी खेळाने धम्म बांधव भारावले.तसेच भोजदरी संगमनेर येथील महिला लेझीम पथकाच्या लेझीम नृत्याने जनसमुदाय थक्क झाला आणि या लेझीम नृत्याने धम्म यात्रेची शोभा वाढविली.


त्यानंतर धम्म सभेला बुद्ध  वंदनेने सुरुवात झाली.
स्वागत व प्रास्ताविक उत्कर्षा रूपवते यांनी केले.सभेचे मुख्य वक्ते ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे,प्रा.आनंद देवडेकर,आमदार डॉ.किरण लहामटे व कॉ.डॉ.अजित नवले  यांनी आपले विचार व्यक्त केले.ॲड.संघराज रुपवते हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी समाजाप्रती आपल्या कार्याबद्दल जेष्ठ कार्यकर्ते बाबुराव निकाळे, बन्सी भाऊ त्रिभुवन,
आर.एस.अभंग व  सुरेश रोकडे यांना दादासाहेब रूपवते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

पोपट सोनवणे व विनय घोसाळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी दिलीप भांगरे, विजय वाकचौरे,विनय सावंत, एम.डी सोनवणे,सुधाकर देशमुख, सुरेश कोते,वी.एम.बैचे,हौसाबाई जगधने,अनुराधा आहेर,माणिक यादव,अजीज वोहरा,वैभव मोकळ,रविंद्र पवार,धम्मयात्रा ग्रामीण व मुंबई कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यां समवेत बहुजन शिक्षण संघ,भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल कार्यकर्ते, अकोले,संगमनेर,नाशिक, शनगर, इगतपुरी,पुणे या भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!