जोर्वेच्या सुपुत्राचे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत सुयश

Cityline Media
0
धनंजय दिघे यांचा सत्कार संविधानाची उद्देशिका देऊन  सन्मान

संगमनेर नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील जोर्वे गावचे सुपुत्र धनंजय दिघे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत ५२९ वा रँक मिळवून भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.त्यानिमित्ताने जोर्वे येथील आंबेडकर नगर मधील सर्व  ग्रामस्थांच्या वतीने धनंजय दिघे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक सेवा निवृत्त कर्मचारी अशोक गायकवाड यांच्या हस्ते भारतीय संविधान,भारतीय संविधानाची उद्देशिका ,शाल, हार,बुके देऊन त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

 यावेळी विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जोर्वे गावचे भूषण आय.पी.एस अधिकारी धनंजय दिघे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.नागरी सत्कार सोहळ्याच्या आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दादासाहेब यादव,तालुकाध्यक्ष साहेबराव यादव,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोळगे,चंद्रकांत थोरात यांनी केले होते.

यावेळी या सत्कार सोहळ्या प्रसंगी जोर्वे गावचे सरपंच प्रीती दिघे,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बंटी यादव,
मा.उपसरपंच वसंत बोरकर, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर इंगळे,ज्येष्ठ कार्यकर्ते रावसाहेब आप्पा काकड,गौतम चव्हाण,युवक कॉग्रेसचे रावसाहेब यादव,बाळासाहेब चव्हाण,

शिवाजी यादव,मोहन गायकवाड,सखाहरी चव्हाण,सुभाष गायकवाड,भिमा चव्हाण,बाबासाहेब चव्हाण,धनंजय दिघे यांचे वडील संजय दिघे,अशोक दिघे,राजेंद्र दिघे, सचिन मोकळ,बाबु रुपवते,
जीवन यादव,गौतम यादव,गोकुळ रुपवते,अजय चव्हाण,
किशोर यादव,बबई गायकवाड, अलका चव्हाण,सीताबाई यादव,छायाबाई रुपवते,कमल वाघमारे,मंदा चव्हाण यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!