श्री.साई आधार फाउंडेशन व श्रीराम दिव्यांग सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने दिव्यांगाना मोफत शिधा वाटप

Cityline Media
0
पुणतांबा प्रतिनिधी कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील संवत्सर  येथील श्री.साई आधार  फाउंडेशन  व श्रीराम दिव्यांग सेवा प्रतिष्ठान (दिव्यांग आश्रम) सेवाभावी संस्थेच्या वतीने संवत्सर येथे नुकतेच  दिव्यांग बांधवांना मोफत किराणा वस्तू देण्यात आल्या.
समाजातील गरजू व अपंग व्यक्तींना आधार मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या वाटप कार्यक्रमात विविध गावांतून शंभर दिव्यांग बांधव उपस्थित होते या उपक्रमामुळे गरजू अपंग लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

हे आश्रम वेळा वेळी दिव्यांगाना. मदत करत असतज नुकतेच त्याच विश्वासाने दिव्यांग बांधवांना किराणा वाटप करण्यात आले.प्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष म्हणाले की आयुष्यात जितके आपल्याला देवांनी दिले त्यातले थोडे दिव्यांग व्यक्तींना द्या! की ज्यांना आपल्या तुलनेत काहीच मिळत नाही आपण आज आहोत तर उद्या नाही त्यामुळे नेहमी. दिव्यांग वक्ती व गरजू व्यक्तींना मदत करत रहा . अशा प्रकारच्या सुंदर वाणीत हा कार्यक्रम येथे पार पडला.

कोणास या आश्रमास  वाढदिवसानिमित्त, काही  कार्यक्रम निम्मित लग्न निमित्त काही मदत करून सेवा.घडवू शकत असल्यास ७८२१०९४८२५/
८२७५८९४२८५.संपर्क करा असे आवाहन अध्यक्षांनी यावेळी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!