आधी विश्वास संपादन केला नंतर साडेपाच लाखास गंडा घातला

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने दुसन्या महिलेला साडेपाच लाख रुपयांसह ५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली.
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी भाविक मनिष भोजवानी (रा. श्रीजी ॲनेक्स, पाथर्डी फाटा) या व्यावसायिक आहेत. आरोपी महिला रंजना हंस (रा. पाथर्डी फाटा) हिने फिर्यादी भोजवानी हिच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण

करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास डबल परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी महिलेकडून ५ लाख ४० हजार रुपये व ५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन आरोपी रंजना हंस या महिलेने आर्थिक

फसवणूक केली. हा प्रकार सन २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत पाथर्डी फाटा येथील घरात घडला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर करीत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!