नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण
राहुरी कमलेश विधाटे राहुरी तहसील कार्यालय यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान अंतर्गत म्हैसगाव येथे विशेष शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
सिंगल विंडो प्रणालीद्वारे नागरिकांच्या प्रलंबित महसूल तक्रारींचे १०० टक्के निवारण करण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.या शिबिरामध्ये अर्ज स्वीकृती, कागदपत्रांची पडताळणी तसेच विविध सेवांचे तात्काळ वितरण करण्यात श्रीरामपुरचे प्रांत अधिकारी किरण सावंत , राहुरीच्या नायब तहसीलदार सौ.दळवी याच्या हस्ते वितरण करण्यात आले.
पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून प्रलंबित फेरफार प्रकरणे आणि महसूल तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले.अभियानांतर्गत मंडळनिहाय नियोजन करण्यात आले असून ताहाराबाद, बारागाव नांदूर, वांबोरी, टाकळीमिया, सात्रळ, ब्राम्हणी, देवळीप्रवरा आणि राहुरी या आठ मंडळांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यापैकी ताहाराबाद मंडळाचे शिबिर म्हैसगाव येथे घेण्यात आले ते यशस्वी झाले. शिबिराला श्रीरामपूरचे प्रांत अधिकारी किरण सावंत प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अभियानांतर्गत विविध दाखले व कागदपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक मंडळात असे कॅम्प आयोजित करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.तसेच वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास मदत होणार आहे.
वन विभागाशी संबंधित गटांच्या अडचणी देखील सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या साठी ई केवायसी करणे गरजचे आहे त्यासाठी सर्व करून घेणे या शिबिरामध्ये संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, जात व उत्पन्न दाखले, नवीन रेशन कार्ड, रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे तसेच पीएम किसान योजनेअंतर्गत नावनोंदणी अशी विविध कामे करण्यात आली.
“जोपर्यंत सर्व अर्ज स्वीकारले जात नाहीत, तोपर्यंत अधिकारी व कर्मचारी येथेच थांबून नागरिकांची कामे पूर्ण करतील,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी राहुरीच्या नायब तहसीलदार सौ.दळवी, श्री. बाचकर,तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी
ताहाराबाद मंडळाचे सर्कल अधिकारी श्री.भालेकर उपस्थित होते. या वेळी कृषी ,भूमी अभिलेख , पंचायत समिती ,तहसील कर्मचारी , महिला व बालविकास विभाग , पुरवठा विभाग,संजय गांधी निराधार योजना विभाग महसूल कर्मचारी ,सेतु कार्यलय ,ग्रामरोजगार सहाय्यक व कर्मचारी उपस्थित होते शिबिराला इतर गावचे आदिवासी ग्रामस्थ उपस्थिती राहुन मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावून विविध सेवांचा लाभ घेतला आहे .
