अबॅकस कौशल्य शिक्षण घेणे ही युगाची गरज: कवयित्री संगीता फासाटे- कटारे

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर अबॅकस क्लास मधील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असून अबॅकस शिक्षण घेणे ही युगाची गरज असल्याचे मत शिरसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या  शिक्षिका,कवयित्री संगीता चंद्रभान फासाटे -कटारे यांनी व्यक्त केले.
येथील बोरावकेनगर मधील अक्षरवेलच्या श्रीराम अबॅकस क्लास मधील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री संगीता फासाटे- कटारे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त व्यवस्थापकीय समुपदेशक सदस्य प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये होते.

श्रीराम अबॅकस क्लास संचालिका प्रा. सौ.पल्लवी सैंदोरे यांनी स्वागत करून पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी श्रीराम अबॅकस क्लासची गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक पालक सोनाली कदम,कल्पना भोये, भारती तुपे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

कवयित्री संगीता फासाटे- कटारे यांनी श्रीराम अबॅकस क्लासच्या संचालिका प्रा..पल्लवी नंदकुमार सैंदोरे यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली अबॅकसचे शिक्षण प्रभावीपणे होत असल्यामुळे या क्लासचे विद्यार्थी जिल्हा,राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. या क्लासच्या गुणवत्तेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा, हे शिक्षण विद्यार्थ्याला बौध्दिक दृष्ट्या संगणक गतीचे बनवितात, ते समजून घ्यावे असे आवाहन केले.

याप्रसंगी प्रा.पल्लवी सेंदोरे यांनी गुणवत्ताधारक विद्यार्थांची यादी जाहीर केली.पुढील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण  करण्यात आले.
स्त १ -रँक १ राजदीप दीपक कदम- ट्रॉफी,मेडल, सर्टिफिकेट रँक २- अर्पित जगन्नाथ जगताप - मेडल, सर्टिफिकेट 

उत्तेजनार्थ - अंकित जगन्नाथ जगताप - मेडल, सर्टिफिकेट लेव्हल २ -रँक १ - आराध्या नंदकुमार सेंदोरे - ट्रॉफी, मेडल, सर्टिफिकेट 
रँक २- चैतन्य चंद्रकांत भोये - ट्रॉफी, मेडल, सर्टिफिकेट 
उत्तेजनार्थ - श्रावणी अरुण तुपे आणि जान्हवी अशोक माहूरे - मेडल व सर्टिफिकेट

सहभागी - देवयानी दीनानाथ धनवडे - सर्टिफिकेट 
तसेच आराध्या आणि श्रावणी यांची एक्सलेंट ऑलिम्पियाड ॲडव्हान्स लेवल परीक्षेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे कॅलिबेल्सची इको फ्रेंडली बॅग आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी अध्यक्षीय भाषणातून अबॅकस शिक्षणाची गरज आणि स्पर्धा परीक्षेचे आवाहन याविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.पल्लवी सैंदोरे यांनी केले. यावेळी श्रीमती चंद्रकला सैंदोरे, ताराताई सैंदोरे यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. कृष्णा सैंदोरे यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!