पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते सायंकाळी होणार उद्घाटन
संगमनेर नितीनचंद्र भालेराव संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे भाजपा महायुती यांच्या वतीने देवगड चषक टेनिज बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार १ मार्च रोजी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते सायंकाळी ५.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुजय विखे,आमदार अमोल खताळ,सार्वजनीक बांधकाम विभाग पुणे मुख्य अभियंता राजेंद्र राहाणे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
देवगड देवस्थान च्या मैदानावर रविवार दि. ०१/०३/२०२६ ते शनिवार ०६/०२/२०२६ पर्यंत. सकाळी ०९ ते ०५ या कालावधीमध्ये भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास एकवीस हजार रुपयांचे पारितोषिक,तर व्दितीय पारितोषिक अकरा हजाराचे, तृतीय पारितोषिक सात हजाराचे तर या सह इतर अनेक पारितोषिक दिले जाणार आहे.स्पर्धेच्या आयोजनासाठी
देवगड देवस्थान ट्रस्ट,सरपंच सेवा संघाचे बाबासाहेब पावसे,समर्थ एन्टरप्रायजेस जे. सी.पी स्पेअर,ओम साई हायड्रॉलिक,श्री गणेश अर्थमुव्हर्स,नितीन बन्सी पावसे,गणेश सातपुते,जय मल्हार कांती संघटना,
ओम साई तरुण मित्र मंडळ,उमाजी नाईक मित्र मंडळ,
शिवछत्रपती मित्र मंडळ,जय मल्हार क्रिकेट टिम,
उंबरवाडी मित्र मंडळ,गुळगंगा मित्र मंडळ,
म्हसोबा नगर मित्र मंडळ, कला सम्राज्ञी पवळा कला मंच, श्री.गणेश मित्र मंडळ,जय भिम मित्र मंडळ,महायुती-भारतीय जनता पार्टी हिवरगाव पावसा यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.स्पर्धेसाठी अकराशे रुपये प्रवेश फी आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी सहभाग घेण्याचे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ पावसे, भाजपा तालुका सरचिटणीस गणेश दवंगे,
भाजपा तालुका उपाध्यक्ष केशव दवंगे यांच्या सह भाजपा महायुती हिवरगाव पावसा यांनी केले आहे.
