स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर प्रतिनिधी गॅस टंचाईच्या काळात अहिल्यानगर शहरात गुलमोहर रोड परिसरात घरगुती गॅस टाक्यामधुन अवैधरित्या व्यवसायीक गॅस टाक्यामध्ये रिफीलिंग करणाऱ्या आरोपींकडून ३३,५०० रुपये किमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद.केल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गॅस टंचाईच्या काळात गॅस टाक्याची अवैध साठवणुक करुन अवैध्यरित्या व्यवसायिक गॅस टाक्यामधुन रिफीलिंग करणारे ठिकाणांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, प्रशांत राठोड,महिला पोलीस अंमलदार,भाग्यश्री भिटे,सोनल भागवत यांचे पथक तयार करुन या पथकास अहिल्यानगर शहरामध्ये माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
अहिल्यानगर शहरामध्ये पेट्रोलींग करत असतांना पथकास साद खान हा त्याचे गुलमोहर रोड,पारिजात चौक जवळील आम्रपाली गार्डन समोर असलेल्या पत्र्याचे गोडाऊन मध्ये घरगुती गॅस टाक्यामधुन व्यवसायीक गॅस टाक्यामध्ये रिफिलिंग करित असल्याची माहिती मिळाली.
पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता,सदर ठिकाणी एक इसम घरगुती गॅस टाक्यामधुन व्यवसायिक गॅस टाक्यामध्ये रिफिलिंग करत असतांना दिसुन आला. त्याला ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांव १) शहानवाज शौकत सय्यद वय -२४ वर्षे रा. दर्गा दायरा जवळ,दगडी चाळ, मुकुंदनगर,अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले आहे.
ताब्यातील इसमाच्या कब्जातुन ११,००/-रु कि.चे १० एच.पी. कंपनीच्या गॅस टाक्या, २०,०००-रु कि.चे दोन इलेक्ट्रीक मोटार मशीन, २५००रु कि.चे ०५ लाल रंगाच्या गॅस टाक्या ५ कि.लो वजनाच्या असा एकुण ३३,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील इसमास सदरच्या गॅस टाक्या कोठुन आणल्या तसेच रिफीलींग कोणाच्या सांगण्यावरुन करत असले बाबत विचारपुस करता त्याने २) साद अन्वर खान रा. घासगल्ली मुकुंदनगर, अहिल्यानगर(फरार) याचे सांगणेवरुन करत असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता,एच.पी.गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या गॅस टाक्यामधुन व्यवसाईक गॅस टाक्यामध्ये रिफिंलिंग करतांना ज्वलनशिल पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका होईल.
अशा धोकादायक पध्दतीने ठेवुन, विक्री करण्याचे उद्देशाने आपले कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने आरोपी विरुध्द तोफखाना पो. स्टे. गु. र. नं. २०१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम २२३, सह जीवनावश्यक वस्तु कायदा कलम ३, ७, सह एल.पी.जी. (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश २००० चे कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे पोलीस यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे हि पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
