आपापल्या कामाचा आढावा पुढील आठ दिवसात संघटनेकडे सादर करा-नाना चव्हाण
मुंबई बाबासाहेब दिवे मागील आठ-दहा महिन्यात नियुक्त केलेल्या राज्य पातळीवरील विभागीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कामाचा आढावा पुढील आठ दिवसात संघटनेकडे सादर करावा अन्यथा दिलेली जबाबदारी पार पडू न शकल्याने आपणावर कारवाई होईल अशा सूचना नुकत्याच मुंबई येथील बाळासाहेब भवनात पार पडलेल्या बैठकीत शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या वतीने प्रदेश संघटक नानाभाऊ चव्हाण यांनी नुकत्याच दिल्या.
मुंबई येथे शिवसेना पक्षाचे मुख्य सचिव संजय मोरे श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मोहिते संघटनेचे उपाध्यक्ष कौशिक आनंद श्रमिक कामगार सेनेचे कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे सचिव अमित भटनागर संघटनेचे राज्य संघटक नाना बच्छाव संघटनेचे राज्य प्रवक्ता उल्हास आवारे यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली.
या बैठकीमध्ये मागील आठ-दहा महिन्यात नियुक्त केलेल्या राज्य पातळीवरील विभागीय पातळीवरील आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कामाचा आढावा पुढील आठ दिवसात संघटनेकडे सादर करावा अन्यथा पक्षाने दिलेली जबाबदारी पार न पाडू
शकल्याने कदाचित आपल्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे असे स्पष्ट करण्यात आले पुढे असे असेही स्पष्ट करण्यात आले की आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या काही वैयक्तिक कारणाने पार पडल्या नसेल तर अजूनही वेळ गेलेली नसून आपण तात्काळ आपल्या विभागाचा आपल्या जिल्ह्याचा
आपल्या तालुक्याचा कार्यकारिणीचा विस्तार केला.
असेल तर सर्व माहिती येणाऱ्या पुढील बैठकीत सादर करावी असा निर्णय या बैठकीत शिवसेना पक्षाचे मुख्य सचिव संजय मोरे यांनी बोलून दाखवला आहे त्यामुळे सर्व बांधवांना आणि भगिनींना कळविण्यात येते की
आपला कार्य अहवाल सादर करावा अन्यथा स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून नवीन नियुक्त्या देण्याचा विचार प्रदेशाध्यक्ष सुरेश मोहितेंनी बोलून दाखवला आहे.
त्यामुळे तत्काळ आपण आपला कार्य अहवाल सादर करावा आणि आपापल्या विभागातील जिल्ह्यातील तालुक्यातील नियुक्ती आणि त्यांचा कार्य अहवाल लवकरात लवकर द्यावा असे आवाहन शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे प्रदेश संघटक नाना बच्छाव यांनी केले.
