कविता,गोष्टी आणि उपक्रमांनी रंगला मराठी राजभाषा दिन
पानोडी प्नतिनिधी माझ्या मराठी मातीचा,लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा. या मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील पानोडी बालपण स्कूलच्या पहिली ते चौथीच्या चिमुकल्यांनी पंचक्रोशीतील दाढ बुद्रुक,प्रतापपूर, डिग्रस, मालुंजे,शेडगाव,हंगेवाडी या गावातील दुकानांना भेट देत त्या दुकानावरील मराठी भाषेतील फलकाचे वाचन करत सदर दुकानदारास मराठी राजभाषेच्या शुभेच्छा देत एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात केले या उपक्रमाचे तालुक्यातुन कौतुक होत आहे तसेच मराठी राजभाषा प्रेमी जनतेने विशेष कौतुक केले.
“मराठी ही आपली मायबोली असून तिचा अभिमान प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात रुजवणे ही काळाची गरज आहे .यावेळी विद्यार्थ्यांनी कविता वाचन,गोष्टी सांगणे,स्वर-व्यंजनांवरील उपक्रम आणि फलक वाचन अशा विविध कृतींमधून मराठी भाषेप्रती आपले प्रेम आणि आदर व्यक्त केला.
मुलांचा उत्साह,आत्मविश्वास आणि सहभाग पाहून आम्हाला खूप आनंद झाला.तसेच एलकेजी व युकेजीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात मुळाक्षरे व दोन ते तीन अक्षरी शब्दाचे वाचन व लेखन मराठीत करत व अक्षरांची ओळख करत आगळ्यावेगळ्या पद्धतीने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.
प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी मराठी कवितांचे लेखन व वाचन करत मराठी भाची भाषेविषयी आपले असलेली असता दाखवत मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. शाळा जरी इंग्रजी माध्यमाची असली तरी मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांची असलेली असता व मराठीत असलेले उपजत ज्ञान हे यातून मराठी भाषेविषयीचे असलेले प्रेम अधोरेखित होते.
शाळेने राबवलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी व पालकांनी चिमुकल्यांचे कौतुक केले.
विद्यार्थी शाळेत पुस्तक वाचन तर करतातच पण समाजामध्ये गावामध्ये वेगवेगळे दुकान वेगवेगळ्या संस्था त्यांची नावे या फलकांचे मराठीत वाचन करून एक आगळावेगळा पायंडा बालपण स्कूलच्या चिमुकल्यांनी समाजापर्यंत नेण्याचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम केला दुकानावरील अवघड नावेही चिमुकल्यांनी अतिशय वेगात वाचत आपले मराठी भाषेविषयी असलेले ज्ञान सिद्ध करत शाळा व विद्यार्थी मराठी भाषेत सुद्धा पारंगत आहेत हे सिद्ध झाले.
