कत्तलखान्यात गायीस घेऊन जाणारी पिकअप गायीसह पोलिसांच्या ताब्यात

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड मुंबई-आग्रा महामार्गावर कत्तलीच्या उद्देशाने एका पिकअप गाडीतून गायीची अवैध वाहतूक केली जात असतांना चांदवड पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी एक गाय व पिकअप गाडी,असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदवड येथील मुंबई-आग्रा रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ आणि निसर्ग लॉन्स परिसरातून एक संशयित महिंद्रा पिकअप वाहन (क्र. ०४ ०७६३) जात होते. परवान्याशिवाय एका चार वर्ष वयाची व सुमारे १० हजार रुपये किमतीची तपकिरी रंगाची गाय कत्तलीच्या इराद्याने वाहनातून नेली जात होती. लासलगाव येथील गोरक्षक प्राणी फाऊंडेशनचे संतोष केदाळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!