राहाता तालुका अनिस कार्यकारणी नुकतीच जाहीर

Cityline Media
0
राहाता तालुका अध्यक्षपदी प्रा.डॉ.नवनाथ शिंदे,तर कार्याध्यक्षपदी कैलास शेळके यांची निवड.

राहाता बाळासाहेब पाळंदे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राहाता तालुक्याची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांच्या प्रमुख  उपस्थितीत नुतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यावेळी राहाता तालुका अध्यक्षपदी  प्रा.डॉ.नवनाथ शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्याध्यक्ष म्हणून कैलास शेळके यांची निवड करण्यात आली प्रसंगी इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष  प्रा. रामभाऊ गमे व संतोष ब्राह्मणे,सचिव अनिल पावटे सहसचिव मिलिंद गांधी यांच्या निवडीला मान्यता दिली तर बुवाबाजी संघर्ष विभाग दिनकर साठे 

वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभाग संतोष उबाळे वार्तापत्र व प्रकाशन विभाग मायकल दिवे मानसिक आरोग्य विभाग डॉ. नरेंद्र पवार महिला सहभाग विभाग विद्या ब्राह्मणे.युवा  विभाग  सुमेध ब्राह्मणे विवेक वाहिनी विभाग पद्मसिंह चांडे प्रशिक्षण विभाग सुनील तांबे

सांस्कृतिक विभाग अमोल निर्मळ सोशल मीडिया आणि प्रसिद्धी विभाग योगेश सातपुते जाती अंत विभाग कानिफनाथ तांबे व बाळासाहेब पाळंदे विविध उपक्रम विभाग शीला संसारे कायदा विभाग ॲड मनोज लोखंडे निवड झाली.सर्व नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्यांचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांनी पुस्तक देऊन अभिनंदन केले.

 राहता तालुक्यात तसेच  शाळा महाविद्यालयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन,जादूटोणाविरोधी कायदा वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प अभियान,विवेक वाहिनी विभागामार्फत  कार्यक्रम घेऊन अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी शाखेच्या वतीने प्रबोधन व प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अरुण कडू, महाराष्ट्र राज्य अध्यक्षा प्रमोदिनी मंडपे तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोळकर, मुक्ता दाभोळकर, प्रवीण देशमुख, गणेश चिंचोले,राहुल थोरात,मिलिंद देशमुख,मधुकर गायकवाड,अशोक कदम, श्रीपाद ललवाणी, अण्णा कडलास्कर,नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे आदींनी अभिनंदन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!