नाशिक दिनकर गायकवाड आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात शासकीय विश्रामगृह नाशिक येथे सर्वपक्षीय,संघटना यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रकाश पगारे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीसाठी निवृत्त न्यायाधीश अनिल जी वैद्य, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख अविनाश शिंदे, ज्येष्ठ कामगार नेते करुणासागर पगारे, कर्मचारी संघटनेचे नेते एकनाथ मोरे,
रिपाई नेते अनिल गांगुर्डे, अरुण दोंदे, हनुमंतराव काळे, कवी नवनाथ काळे, शिवाजी गायकवाड, प्रकाश अंभोरे, शिक्षक नेते चंद्रकांत गायकवाड, राहुल जगताप, युवराज शेगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यभर मोठे आंदोलन उभे करणार असून सरकारला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्याचा निर्धार यावेळी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती ने केला.
रविवार दिनांक १९एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता हॉटेल रॉयल हेरिटेज गंजामाळ नाशिक येथे तमाम आंबेडकरी समाजाची सर्व व्यापक बैठक आयोजित करण्यात आली असून समग्र आंबेडकर समाजाने एक मुखाने लढ्याला बळ द्यावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश पगारे व मुख्य निमंत्रक अविनाश शिंदे व अनिल गांगुर्डे यांनी यावेळी केले.
