इंदू मिलच्या जागेवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक त्वरित पूर्ण करा अन्यथा आंदोलन

Cityline Media
0
संकल्पित रिपाई पक्षप्रमुख प्रकाश पगारेंचा इशारा 

नाशिक दिनकर गायकवाड दादर (मुंबई) येथील इंदू मिलच्या जागेवर होणारे स्वारक सरकारने तात्काळ पूर्ण करावे अन्यथा संकल्पित रिपाई तर्फे शासनाच्या निषेधार्थ अंदोलन करणार असल्याचा इशारा नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना रिपाइं संकल्पित पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख प्रकाश पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच देण्यात आला.
संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे शिष्टमंडळ द्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक वर्षापासुन स्मारकाचे काम चालु आहे,परंतु लोर्कासणास उशिर का? होत आहे हा आंबेडकरी जनतेच्या जिव्हाळयाचा प्रश्न असुन निवडणूका आल्या कि शासन लोकार्पणाची घोषणा करते व गाजर दाखवते.परंतु प्रत्यक्षात तसे काहीच होतांना दिसत नाही.शासनाने उर्वरीत काम तात्काळ करावे व पोकळ आश्वासन देवू नये.

अन्यथा १५ वर्षापुर्वी जो संघर्ष केला असा संघर्ष कार्यकर्त्यांना लागेल याची शासनाने नोंद घ्यावी या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री.समाज कल्याणमंत्री, यांना पाठविण्यात आल्या आहेत.

निवेदनावर पक्षप्रमुख प्रकाश पगारे सजाभाऊ समशेर शिवाजी गायकवाड,चर्मकार आघाडी प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संजय सानप उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष
हनुमंत काळे संपर्क प्रमुख यांच्या सह्या आहेत
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!