कोल्हार भगवतीपुरच्या जि.प.शाळेत नवगतांचे स्वागत;यंदापासून सीबीएससी अभ्यासक्रम

Cityline Media
0
कोल्हार अरुण बोरूडे राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पहिली इयत्तेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना प्रवेश देण्यात आला. विशेष म्हणजे, यंदा शाळेत तब्बल २७ विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी प्रवेश घेतल्याने शाळेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून आले.
नुतन प्रवेशाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. बालकांचे पहिले पाऊल शाळेत ठशांच्या रूपाने जतन करण्यात येणार असल्याने हा उपक्रम सर्वांसाठी आकर्षण ठरला. यावेळी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यात आला. या आगळ्या-वेगळ्या स्वागतामुळे विद्यार्थी व पालक दोघेही आनंदित झाले.

या शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून डिजिटल क्लासरूम, ई-लर्निंग,सेमी इंग्रजी शिक्षण, ज्ञानरचनावाद पद्धतीवर आधारित बालस्नेही शिक्षण तसेच यंदापासून सीबीएससी बोर्डानुसार अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके,गणवेश, बूट उपलब्ध करून दिले जातात. वार्षिक स्नेहसंमेलन, विविध गुणदर्शन कार्यक्रम, वक्तृत्व, निबंध, लेखन व क्रीडा स्पर्धांचे आयोजन नियमितपणे केले जाते.

शाळेतील विद्यार्थ्यांनी यापूर्वी तालुकास्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्येही यश मिळवले आहे. सर्व शिक्षक टीईटी पात्र व उच्चशिक्षित असून शाळेची इमारत सुसज्ज व सर्व भौतिक सुविधांनी युक्त आहे. कुसुमाग्रज वाचन अभियान, चित्रकला स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षांचे मार्गदर्शन आदी उपक्रमांमुळे पालकांचा या शाळेकडे ओढा वाढत आहे.

या कार्यक्रमाला मुख्याध्यापक साहेबराव अनाप,सविता कडलग, राजेंद्र बोकंद, हौशीनाथ सजन, विद्या उदावंत, मनिषा शिंदे,शितल देशमुख, लता गाडेकर, रूपाली नाईक, पुंडलिक महाले आदी शिक्षक उपस्थित होते.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय बोरुडे यांच्यासह अनिल कांबळे,राजेंद्र गुजर, शानुर शेख, वर्षा राजभोज, सविता ओहोळ, राजेंद्र गायकवाड, सोनाली बोरुडे, संतोष गीते, कविता खंडागळे, संतोष लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमावेळी शाळेची आकर्षक सजावट व सुंदर रांगोळी करण्यात आली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याताई उदावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन शितल देशमुख यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!