पेमगिरी पेमाईदेवी यात्रेनिमित्त आमदार खताळ दांपत्याकडून महाआरती

Cityline Media
0
आमदार अमोल खताळ आणि पत्नी सौ.नीलम खताळ यांच्या हस्ते  महापूजा

संगमनेर प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील शिव संकल्प भुमी पेमगिरी येथील पेमाईदेवी मातेचा यात्रोत्सवनिमित्त आमदार अमोल खताळ आणि पत्नी सौ.नीलम खताळ यांच्या हस्ते महापूजा होऊन आरती झाली आणि  दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी सौ.नीलम खताळ यांनी संकल्पभूमी पेमगिरी येथे उपस्थित राहून पेमाईदेवी मातेची विधीवत महापूजा केली. त्यानंतर त्यांनी महाआरती करून देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यात्रोत्सवा च्या निमित्त गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत आमदार खताळ यांनी सपत्नीक सहभाग घेऊन उत्साह वाढविला. मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. स्थानिक ग्रामस्थ व मंदिर समितीच्या वतीने यात्रेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने महिला व युवक उपस्थित होते. पेमाईदेवी मातेच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात हा यात्रोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.यावेळी संकल्प शिव संकल्प भूमी पेमगिरी येथील ग्रामस्थ व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!